पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांत कोणाचें काय साधलें ? तेज त्यांत नाहीं, हे जाणून फ्रेंच खलाशांनी हा वीरवृत्तीचा मार्ग पत्करला हे त्यांस अत्यंत भूषणावह आहे. व्हिशी सरकारची वडवाघळाची स्थिति व्हिशी सरकारच्या दुरवस्थेची मात्र कोणासहि कींवच येईल. जर्मनीच्या हाती शेंडी असल्यामुळे बाह्यतः जर्मनीचा अनुनय, दोस्तांचा जय झाला तर जर्म- नीचे परभारें उट्टे निघाल्यानें मनांतून वाटणारें समाधान पण ते बाहेर दाखविण्या- चीहि चोरी, आणि उघडपणें कोणत्या तरी एका पक्षास मिळून होतील ते परिणाम सोसण्याला लागणारा कणखरपणाचा अभाव, या त्रिदोषाच्या तावडीत सांपडल्याने व्हिशी सरकारला धड जर्मनीची मर्जी सांभाळतां आली नाहीं, धड दोस्तांची मैत्रीहि राखतां आली नाही, त्यामुळे त्याची वडवाघळासारखी स्थिति झाली आहे. मनाच्या असल्या दोलायमानस्थितीत व्हिशी सरकारने आपल्या आरमारास बुडून जाण्याचा सल्ला दिल्याचें पाहून कोणासहि कृष्णाकुमारीच्या दुबळ्या मनाच्या पित्याची आठवण होईल. दोघां रजपूत राण्यांनी तिला मागणी घातली असतां ती कोणा एकाला दिली असतां दुसरा राणा आपला शत्रु होईल याची धास्ती खाऊन या भित्र्या राण्यानें कृष्णाकुमारीला विष देऊन मारून टाकण्याचे ठरविले व त्या बिचारीचा प्राण घेतला! व्हिशी सरकारचीहि तशीच गत झाली. जर्मनीचा व इंग्लंडचा कोणाचाच राग सहन करण्याचें धैर्य अंगी नसल्यामुळे या पेंचांतून सुटण्याचा मार्ग म्हणून आरमा- राचें बलिदान देण्याचें त्या दुबळ्या सरकारने ठरविले. त्यामुळे बिचाऱ्या कृष्णाकु- मारीप्रमाणें आरमार तेवढे 'फुकट बळी गेलें; पण आतां दोन्ही राष्ट्र संतप्त होणार याची वाट काय ? आम्हांस या लबाडीनें फसविलें म्हणून दोघेंहि यापुढे त्यावर दांतओंठ खाणार व त्यांच्याशीं शत्रुत्वानें वागणारच वागणार. फ्रेंच हुतात्म्यांस वीरोचित स्वर्गलोक अर्थातच आरमाराच्या या बलिदानामुळे व्हिशी सरकारचा बेत साधला नाहीं, जर्मनांच्या हातचा डाव फुकट गेला आणि दोस्तांचें कारस्थानहि फिसकटले. यांत कोणाचेंच कांही साधलें नाहीं. मात्र आईबापांवरचें संकट टाळण्याकरितां व कुलाची अब्रू वांचविण्याकरितां कृष्णाकुमारीनें विषाचा प्याला धैर्याने पिऊन टाकला यामुळे तिची कीर्ति जशी अजरामर झाली त्याचप्रमाणे व्हिशी सरकारावरचें संकट टाळ- ण्याकरितां आणि फ्रेंच राष्ट्राची अब्रू राखण्याकरितां, ज्या फ्रेंच खलाशांनी आपले आरमार आपल्या हातानें बुडविलें व त्याचबरोबर स्वतःच्या जीवाचेंहि बलिदान दिले त्या हुतात्म्यांची कीर्ति मात्र इतिहासांत अजरामर राहील, कारण त्यांनीच तेवढा वीरोचित स्वर्गलोक साधला.