पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध लाव्हलच्या धोरणाला अनुसरून चालू लागले. लाव्हल यांचें हिटलरवर वजन मुळींच नाहीं, पण मुसोलिनीची व त्याची मोठी दोस्ती आहे; तेव्हां मुसोलिनीमार्फत हिटलरवर वजन पाडून आपण आपला कार्यभाग साधूं असें लाव्हलला वाटत होतें. उलटपक्षी लाव्हल हा इंग्रजांचा द्वेष्टा असल्याची जाणीव ब्रिटिश मंत्रिमंडळाला असल्याने लाव्ह- लच्या हाती सत्ता गेल्यास फ्रान्स देश तटस्थ न राहतां गट्टी राष्ट्रांना मिळेल अशी त्यांना धाकधूक वाटत होती आणि याचें प्रत्यंतर फेंच आरमाराच्या हालचाली- वरून येऊ लागले. व्हिशी सरकारच्या डळमळीत धोरणावरून फ्रेंच आरमार जर्मनीच्या हातीं पडेल असे वाटून ब्रिटिशांनीं तें हस्तगत करण्याचा विचार ठरविला. त्यामुळे उत्तर आफ्रिकेतील ओरान बंदरांत आरमारी चकमक झडली आणि फ्रेंचांचें तेथलें आरमार बुडविलें गेलें. हा ओरानचा प्रसंग लक्षांत घेतला म्हणजे टूलोन येथलें आरमार कसें व कां बुडविलें गेलें यांचा ग्रंथ लागतो. फ्रान्समधील तीन पक्ष फ्रेंचांच्या शरणागतीच्या प्रसंगापासून फ्रेंच जनतेंत तीन पक्ष निर्माण झाले आहेत. दगुल यांचा स्वतंत्र फ्रान्स पक्ष. हा सर्वतोंपरी ब्रिटिशांच्या बाजूचा असून ब्रिटिशांच्या साहाय्यानें फ्रान्सचें स्वातंत्र्य परत मिळविण्याची उमेद बाळगणारा आहे. मार्शल पेताँ व अॅडमिरल डार्ला यांचा पक्षहि दगुल यांच्या पक्षाइतकाच जर्मनद्वेष्टा आहे. तथापि डंकर्क प्रकरणापासून त्यांच्या मनांत इंग्लिशांविषयींहि अढी बसलेली आहे, यामुळे इंग्लंडचें साहाय्य मिळवून फ्रेंच साम्राज्य टिकवितां येईल असे त्यांस वाटत नाहीं. त्यापेक्षां शस्त्रसंधीच्या अटी पाळून अव्यात फ्रान्स आणि फ्रेंच वसाहती यांचें आपणच स्वतंत्रपणे संरक्षण करावें असे या पक्षाचें म्हणणे आहे. याहून द गुल यांची विचारसरणी वेगळी असल्यामुळे द गुल व अॅड. डार्ला यांच्यांत वितुष्ट आले आणि डाकारच्या मोहिमेमुळे उभयपक्षांतला मतभेद वज्रलेप झाला. शल्यमामा लाव्हल यांचा तृतीय पंथ तर सर्वश्रुतच आहे. त्यांचें इटालीशीं पूर्ण सख्य आणि इटालीची जर्मनीशी दोस्ती म्हणून लाव्हलचीहि जर्मनीशी दोस्ती. अर्थातच जर्मनीशी नमते घेऊन वागल्यानेंच फ्रेंच वसाहती सुरक्षित राहतील आणि युद्ध समाप्तीनंतर जर्मनव्याप्त फ्रान्सहि परत आपल्या हातीं येईल या आशेवर यांचा कारभार चाललेला. अशा परि- स्थितीत जर्मनांना तर दुखवावयाचे नाही आणि जर्मनीकडून फ्रेंचांना अधिकाधिक सवलती मागून घेऊन फ्रेंचांना खूष ठेवावयाचें, असा तारेवरचा नाच लाव्हल यांनी चालविला होता. या दुटप्पी धोरणांत फ्रेंचांना खूष राखणें जेव्हां अशक्य झालें तेव्हां लाव्हलला नव्या मंत्रिमंडळांतून निघावें लागलें; परंतु लाव्हल निघाल्यानें जर्मनीची बाजू फ्रेंच कारभारांत लंगडी पडूं लागली. तेव्हां जर्मनीनें तंबी देऊन लाव्हलची पुनश्च सल्लागार मंडळांत स्थापना करविली; एवढेच नव्हे तर लाव्हलच्या परवानगीशिवाय फ्रेंचांच्या कारभारांत पानहि हालूं नये असा बंदोबस्त जर्मनीने केला. ५४