पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांत कोणाचें काय साधलें ? ५३ परिणाममीमांसा करण्यापूर्वी स्वतःला समुद्रांत बुडवून घेऊन जगाला आश्चर्यात बुडविणा-या या हुतात्म्यांनी हे सतीचें वाण कां घेतले याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. बेल्जम, इंग्लंड व प्रान्स यांचे सेनाशकट विध्वंसून, फ्रान्स देशांत मुसंडी मारून, जेव्हां जर्मन सैन्याने फ्रेंचांची लांडगेतोड चालविली, त्यावेळी 'दे माय धरणी ठाय' असंच अक्षरशः म्हणण्याची फ्रेंचांवर पाळी आली. त्या संकटकाली धीर देण्याला दोस्त राष्ट्रांतले कोणीहि सोबती ठिकाणावर राहिले नाहीत, असे पाहून नाराज झालेल्या फ्रेंचांना नलोपाख्यानांतील 'कठिण समय येतां कोण कामास येतो' या राजहंसोक्तीचें वारंवार स्मरण झाले असल्यास नवल नाहीं. अशा संकटप्रसंगी फ्रेंच मंत्रिमंडळ पॅरिस सोइन बोर्डोला गेलें आणि तेथें पुढे काय करावें याची भवति न भवति झाली. त्या वेळी फ्रेंच मंत्रिमंडळांत दोन पक्ष निर्माण झाले. व्हिशी सरकारची स्थापना कशी झाली ? इंग्लंडच्या सैन्याने डंकर्क पाहिल्यामुळे यापुढे फ्रान्स देशांत ठाण मांडून जर्मनांचा प्रतिकार करणे अशक्य आहे याविषयीं मंत्रिमंडळांत मतभेद नव्हताच. मात्र एका पक्षाचे म्हणणे असें होतें कीं, मंत्रिमंडळानें फ्रान्स देश सोडून उत्तर आफ्रिकेंत जावें आणि तेथील फ्रेंच वसाहतींतून जर्मनांशीं युद्ध चालवावें. दुसऱ्या पक्षाला हा बेत नापसंत होता. त्याची विचारसरणी अशी होती की, आफ्रिकेंत जाऊन तरी आपण कोणाच्या बळावर लढणार ? फ्रान्सांत एवढी सेना व रण- सामुग्री सज्ज असतांना जेथें टिकाव लागला नाही तेथें आफ्रिकेतल्या तुटपुंज्या रणसांहित्यावर कसा निर्वाह लागेल ? अर्थातच निरुपाय म्हणून संकटापुढे मान लववावी आणि जर्मनांशी शस्त्रसंधि करून फ्रान्सचा अर्धामुर्धा भाग आणि इतरत्र असलेल्या सर्व वसाहती वांचवाव्या आणि युद्धाचा शेवट होईपर्यंत तटस्थ वृत्ति धारण करून मार्गप्रतीक्षा करीत राहावें. या शरणागति पक्षाचें अध्वर्युत्व लाव्हल यांजकडे होतें. मार्शल पेताँ हे प्रथम युद्ध चालू ठेवावें या मताचें होतें; आणि त्यांच्या वजनानें युद्ध चालवावें म्हणणाऱ्या पक्षाचें मताधिक्य होऊन फ्रेंच सर- कारची कचेरी उत्तर आफ्रिकेंत नेण्याचें व तेथून लढाई चालविण्याचे ठरले. पण लाव्हल, मार्के आणि अलिबर्ट या त्रयीनें रातोरात मार्शल पेताँ यांची भेट घेऊन त्यांस गळ घातली आणि निष्कारण युद्ध लांबवून फ्रेंच जनतेचे हाल वाढवूं नका, असा युक्तिवाद करून बुद्धिभेद केला; त्यामुळे आदल्या दिवशीचा बेत डळमळला आणि शस्त्रसंधि ठरून व्हिशी येथे नव्या फ्रेंच सरकारची स्थापना झाली. ओरान व दूलोन यांचा संबंध ही सगळी उलटापालट घडवून आणण्याची कारवाई लाव्हल यांच्या शल्य- नीतीनेंच केली. याच कारणावरून त्या वेळेपासून नव्या फ्रेंच सरकारचे डावपेंच