पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध घेण्यासारखा होणार नाही. आतांपर्यंत जर्मनीचे व जपानचे डावपेंच परस्परांना अप्रत्यक्ष रीतीनें पोषक असले तरी ते अलग अलग असून त्यांचा प्रत्यक्षतः एकमेकांवर परिणाम घडत नसे असेंच दिसून आले आहे. याच दृष्टीने पाहिल्यास या वेळी जपान सैबेरियावर स्वारी करील ही अपेक्षा असमर्थनीय ठरते. जर्मनीला जशी सध्यांची आघाडीच पुरून उरणार आहे याप्रमाणे जपानलाहि सालोमन बेटें, चीनं व ब्रह्मदेश या तीन ठिकाणच्या आघाड्या पुरून उरणार आहेत. याकरितां सध्यां तरी ऑस्ट्रेलियावर स्वारी करण्याचा विचार जपान मनांत आणणार नाहीं आणि सैबेरियाची स्वारी तर त्याच्या युद्धाच्या डावपेंचांतच अद्यापि समाविष्ट झालेली दिसत नाही. ब्रह्मदेशांतच काय ती त्याची विशेष हालचाल दिसेल. ती चढाईची होईल कां बचावाची होईल हें दोस्त राष्ट्रांच्या या बाजूच्या सैन्याच्या सामर्थ्यावर व हालचालींवर अवलंबून राहणार आहे. ५२ यांत कोणाचें काय साधलें ? ११ [ फ्रान्सच्या शरणागतीनंतर अनाक्रान्त फ्रान्सचा कारभार जर्मनांच्या तंत्रानें चालला होता. त्यामुळे फ्रेचांचें आरमार जर्मनीच्या हातीं पडेल, अशी दोस्त राष्टांना भीति वाटत होती. ही भीति निर्मूल करण्याकरितां ब्रिटिशांनीं फ्रेंच आरमार आपल्या ताब्यांत घेण्याचें ठरविलें. पण त्यामुळे जर्मनांचा आप- ल्यावर रोष होईल आणि आपल्या अस्तित्वाला धोका येईल म्हणून व्हिशी सरकारने आपलें आरमार ब्रिटिशांच्या हवाली करण्याचें नाकारलें. तेव्हां आफ्रि- केंतील ओरान बंदरांतलें फ्रेंचांचें आरमार ब्रिटिशांनीं बुडविलें आणि फ्रान्सच्या टुलोन बंदरांतलें आरमार हस्तगत करण्याचा प्रयत्न चालविला. त्यावेळी फ्रेंच आर- मारानें तें संकट टाळण्यासाठी जलसमाधि घेतली. त्या रोमहर्षण होतात्म्याची पूर्वपीठिका यांत वर्णिली आहे. ] महायुद्धाच्या प्रस्तावनेपासून आतापर्यंतच्या काळांत ज्या अनेक अद्भुत घटना घडल्या त्यांत टुलोन बंदरांतल्या फ्रेंच आरमाराने घेतलेली जलसमाधि ही एक अद्भुत रोमांचकारी घटना गणली जाईल यांत शंका नाहीं. जलसमाधीची ही आश्चर्यचकित करून सोडणारी वार्ता कानी आल्यापासून या जलसमाधीचा परि णाम कोणावर कसा घडेल याचा विचार साहजिकच मनांत घोळतो. पण ही ( केसरी, दि. ११ डिसेंबर १९४२ ) 4