पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धाचा रंग पालटला ५१ एवढ्याचकरितां असले आश्वासन देण्यांत आले असावें हे उघड आहे. जर्मनीनेंहि स्पेनला असेंच आश्वासन दिले आहे अशी वार्ता प्रसृत झाली होती; पण तिचा ताबडतोब इन्कार करण्यांत आला हे मोठे सूचक आहे. आधीं आश्वासन देऊन मागाहून तें धाब्यावर बसविण्याची वचनभ्रष्टता जर्मनीच्या हातून होणार नाहीं असे मुळींच नाहीं; तरी पण असे आश्वासन मुळीं दिलेच नाहीं असे जाहीर करण्यांत वचनभंगाचा आरोप करण्याला मागाहून जागा राहूं नये अशाविषयीं जर्मनी जपत आहे असे दिसते. तथापि एकंदर परिस्थिति पाहतां स्पेन आपला तटस्थपणा सोडणार नाही हेच जास्त संभवनीय आहे. तुर्कस्तानच्या तटस्थतेचा भंग होईल काय ? तुर्कस्तानने आपण तटस्थ राहणार असें पुनश्च एकदां जाहीर केले आहे. महायुद्धाला सुरुवात झाल्यापासून तुर्कस्तान अशी घोषणा वारंवार करीत आला आहे आणि त्या बाबतींत तुर्कस्तानच्या आजूबाजूची परिस्थितीच अशी आहे कीं, तुर्कस्तानला तटस्थ राहणें हेंच सर्वात अधिक फायदेशीर आहे, यास्तव तुर्कस्ताननें यावेळी कांहींहि घोषणा न केली तरी कोणीहि असेंच अनुमान करील कीं, तुर्कस्तानच्या तटस्थतेच्या भंग होण्याची वेळ आलेली नाहीं. असे असतां याच वेळीं जर्मनी सीरियावर स्वारी करणार व त्याकरितां तुर्कस्तानकडे वाट देण्याची मागणी करणार, जशी जी बातमी प्रसिद्ध केली जात आहे ती कोणी तरी जाणूनबूजन दिशाभूल करण्यासाठी उठविलेली हूल असावी; कारण जर्मनीला सध्या आपल्या हातची रणांगणे सांभाळणेच अव- घड होत चाललं असून अशा वेळी जर्मनी सीरियाची नवी मोहीम अंगावर कशी घेईल ! ईजिप्तमधील युद्धांत जर्मन सेनापतीच्या हातून कितीहि चुका घडल्या असल्या तरी सीरियाच्या मोहिमेची नसती भानगड अंगावर ओढून घेऊन तुर्कस्तानला डिवचन आपण होऊन त्याला दोस्तांच्या गटांत सामील होण्याची संधि देण्याइतके कांहीं जर्मन सेनापति वेडे नसतील. अर्थातच जर्मनीचें सगळें लक्ष सध्यां आफ्रिकेतील आपली बाजू कशी सांभाळावयाची आणि दोस्त राष्ट्रांची मोहीम युरोपांतल्या आपल्या प्रदेशावर येऊन ठेपेल तर तिचा प्रतिकार कसा करावयाचा याकडेच पूर्णपणे वेधून राहील. रशियांतील सर्व आघाड्यांवर जर्मनी यापुढे हिवाळा संपेपर्यंत बचावाचेंच धोरण स्वीकारील. मात्र रशिया याला तसें स्वस्थ बसूं न देतां सतावून सोडण्याचा डाव टाकल व त्याचा शक्य तितका प्रतिकार जर्मनीला करावा लागेल. जपानचे डावपेंच दोस्तांच्या या नव्या चढाईचा परिणाम जर्मनीच्या रशियन मोहिमेवर खात्रीने होत आहे; परंतु जपानच्या डावपेंचांवर याचा परिणाम विशेष लक्षांत