पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धाचा रंग पालटला 101 वरूनच अमेरिकनांनी चढाईसाठी ही मोक्याची जागा पसंत केली असावी असे दिसतें आणि दोस्त राष्ट्रांच्या मुत्सद्दयांचा हा तर्क वावगा नाहीं असे आतांपर्यंतच्या घडामोडींवरून दिसत आहे. अमेरिकन सैन्य आफ्रिकन किनाऱ्यावर येऊन उतर- तांच फ्रेंच अॅडमिरल डॉल यानें अमेरिकनांना प्रतिकार करावयाचा नाहीं असें ठरविलें आणि व्हिशी येथून आलेले हुकूम धाब्यावर बसविले. फ्रेंच सेनापति गिरॉड द्दाहि डार्लाच्या तंत्रानेंच वागतो आहे असे दिसते. तथापि त्या उभयतांचे बेत कितपत सिद्धीस गेले हें अद्यापि उघडकीस आलें नाहीं. अॅडमिरल डार्ला यांना अटक करण्यांत आली असेंहि वृत्त प्रारंभी प्रसिद्ध झाले होते. पण अलीकडे डॉर्ला व गिराड यांच्यासंबंधानें निश्चित अशी कांहींच वार्ता आलेली नाही. व्हिशी सरकारची केविलवाणी स्थिति व्हिशी सरकारची मात्र अगदीं केविलवाणी स्थिति झाली आहे. अमेरिकेने फ्रेंचांच्या मुलुखांत पाऊल टाकूं नये असें व्हिशी सरकारनें रूझवेल्ट यास कळविले असतां तें अर्थातच मानले गेले नाही. उलट बाजूनें अमेरिकांनाना आम्ही प्रतिबंध करतों असें व्हिशी सरकारनें गट्टी राष्ट्रांना कळविले असतां त्याचाहि कांहीं उपयोग झाला नाहीं. अमेरिकन स्वारीला तोंड देण्याचे सामर्थ्य फ्रेंचांच्या अंगीं नाहीं आणि शिवाय व्हिशी सरकारनें अमेरिकनांना प्रतिबंध करण्यासंबंधानें हुकूम आफ्रिकेतील आपल्या अधिका-यांना दिले तरी ते अधिकारी व्हिशी सरकारची आज्ञा कितपत पाळतील याविषयींहि गट्टी राष्ट्रांना साहजिकच संशय वाटत आहे. अशा या दुहेरी कारणांमुळे गट्टी राष्ट्रांनी असें ठरविलें कीं, फ्रेंचांच्या हालचालींवर विसंबून न राहतां दोस्तांच्या दुसऱ्या आघाडीला तोंड देण्यासाठी जी कांहीं तजवीज करावी लागेल ती आपली आपणच करावी; आणि तशी तजवीज करावयाची म्हटल्यास फ्रान्सशीं झालेला पूर्वीचा करार मोडून फ्रान्सच्या अव्यात भागांत आपले सैन्य पाठवावें लागणार; पण युद्धाच्या भाऊगर्दीत असल्या करारांना किंमत कितपत असते हैं अनुभवसिद्धच आहे. फ्रेंच आरमाराचें काय होणार ? अर्थातच जर्मनी व इटाली या उभतांनींहि आपआपली सैन्यें फ्रान्सच्या आतां- पर्यंतच्या अव्याप्त भागांत पाठवून तेथून दोस्त राष्ट्रांच्या चढाईला तोंड देण्याची तजवीज सुरू केली आहे. त्यांत जर्मनीनें फ्रान्सचा दक्षिण-किनारा आणि विशेषतः त्या किनाऱ्यावरील मार्सेलिस व टूलोन हीं बंदरें आपल्या संरक्षणाखाली घेतली असून इटालीने नाईस शहर व्यापलें आहे. ऑफ्रिकेचा किनारा व्यापल्यानंतर भूमध्य समुद्रांतून इटालीवर व फ्रान्सवर चालून येण्याचा दोस्तांचा मानस असणार असें समजून जर्मनीनें इटालीच्या मदतीसाठी म्हणून आपले कांहीं सैन्य इटालीतहि रवाना केले आहे. फ्रेंच किनाऱ्यावर उतरण्यापूर्वी कॉर्सिका बेट दोस्तांकडून व्यापले जाईल असा तर्क करून इटालीनें कॉर्सिका बेटहि आपल्या ताब्यांत घेतले आहे.