पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध संख्येत जर्मनांत व इटालियनांत जें अंतर दिसून येतें त्यावरूनहि ही लढाई रोमेलच्या तंत्राप्रमाणे लढली गेली नसावी असा संशय येतो. ब्रिटिशांच्या चढाईत आघाडीला रणगाडे न पाठवितां पायदळानेंच प्रथम चढाई केली आणि दक्षिणे- कडील भागावर हल्ला होण्याचा विशेष संभव असतां अत्तरेकडील भागावरच ब्रिटिश पायदळ चालून आले व त्याने गट्टी राष्ट्रांच्या सैन्यांत खिंडार पाडून रणगाड्यांना वाट करून दिली असें जें वर्णन आले आहे तेंहि सूचक आहे. आफ्रिकन किनारा ही मोक्याची जागा तें कसंहि असो, मार्शल रोमेलसारख्या अव्वल दर्जाच्या जर्मन सेनापतीचा सपशेल पराभव होऊन नुसता ईजिप्तमधलाच प्रदेश नव्हे तर लिबियांतलाहि बेंगाझी- पर्यंतचा प्रदेश त्यास सोडावा लागला आणि विशेषतः टोब्रुकसारखें बळकट स्थळ हातचें गमवावे लागले, यामुळे आफ्रिकेतील युद्धाचा रंग पालटला यांय शंका नाहीं; पण नुसता रोमेलचा पराभव करून माँटगॉमेरी त्याच्या पाठीस लागल्यानें युद्धाचा शेवट समीप येण्याचा संभव नाहीं; कारण केवळ आफ्रिकेतील दोन सैन्यांच्या जयाप- जयावर महायुद्धाचें भवितव्य अवलंबून नाहीं. आफ्रिकेतल्या ज्या नव्या घडामोडी- मुळे महायुद्धाचा रंग पालटू लागला ती घडामोड रोमेलच्या पराभवाहून वेगळीच आहे. अमेरिकेचें लाख दीड लाख सैन्य, ब्रिटिश आरमाराच्या मदतीनें आणि ब्रिटिश विमानांच्या सहकारितेनें, आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावर येऊन उतरलें ही घडामोड खरी प्रभावी ठरणार आहे. आतांपर्यंत अमेरिकेतून आठ लक्ष सैनिक युद्धासाठी पर- देशांत रवाना झाले आहेत. तथापि ते अनेक ठिकाणी पांगलेले असून त्यांची त्यांतली कोणतीहि छावणी महत्त्वाची रणभूमि झालेली नाहीं. पण उत्तर-आफ्रिकेच्या किना- ज्याची जागा ही अशी मोक्याची जागा आहे की, त्या रणभूमीवरून महायुद्धाला महत्त्वाचें वळण देतां येण्यासारखे आहे आणि हे बिंग ओळखूनच पाताळयंत्री चर्चिलसाहेबांनी स्टॅलिनची भीडमुर्वत न धरतां आफ्रिकेतच दुसरी आघाडी कर- ण्याची आपली योजना ठाम केली. फ्रेंचांचा मुलूख बेवारशी इस्टेट आफ्रिकेच्या पश्चिम व उत्तर किनाऱ्यावर फ्रेंचांचा पुष्कळच मुलूख असून फ्रान्सच्या शरणागतीपासून त्या मुलुखाची बेवारशी इस्टेटीसारखी स्थिति झाली आहे. दोस्त राष्ट्रांना अनुकूल असलेले फ्रेंच सेनापति तेथें ठाणे मांडून बसले तर तो मुलूख दोस्तांच्या बाजूला वळतो. उलटपक्षी गट्टी राष्ट्रांना अनुकूल असलेल्या अधिकाऱ्यांनी जोराची हालचाल केल्यास तेथील सत्तेचें पारडें गट्टी राष्ट्रांच्या बाजूला झुकूं लागते. अशा परिस्थितींत अमेरिकेचें व ग्रेट ब्रिटनचें मोठें आरमार व सैन्य यानें तेथे येऊन त्या मुलुखाचा कबजा घ्यावयाचें मनांत आण- ल्यास तेथील फ्रेंच अधिकारी दोस्तांना येऊन मिळतील असा भरंवसा वाटल्या