पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धाचा रंग पालटला असा पोक्त विचार करून इंग्लंड व अमेरिका या राष्ट्रांतील लष्करी तज्ज्ञांनी व मुत्सद्दयांनी या स्वारीचा बेत योजिला आणि तो झटपटीने व मोठ्या शिताफीने अमलांत आणला ! ४७ अपूर्व नवलाईचें यश ईजिप्तमधील ब्रिटिशांच्या व्या प्रतनेशी लडण्यांत रोमेल गुंतला असतां इकडे त्याच्या पिछाडीला हे मोठें सैन्य उतरविण्यांत आलें. हे सैन्य आफ्रिकन किनाऱ्यावर उतरण्यापूर्वीच रामेलचा तिकडे पुरता फडशा पडला होताच. तेव्हां अमेरिकन सैन्य पिछाडीवर उतरलें म्हणून रोमेलला मागें हटावें लागले असे म्हणतां येणार नाहीं. तरी पण रोमेलची पीछेहाट सुरू होण्याला आणि दोस्तांचीं सैन्यं आफ्रिकन किनाऱ्यावर उतरण्याला एकच गांठ पडल्यामुळे रोमेलच्या पीछेहाटीला धांवपळीचें स्वरूप आले असावें असे म्हणण्यास हरकत नाही. किंबहुना रोमेलचा इतक्या जलदीनें पराभव होईल अशी अगाऊ कल्पना नसल्यानें रोमेलचा पराभव करणे सुकर व्हावे म्हणून इकडे आठव्या पृतनेची चढाई चालू होण्याच्या वेळेसच अमेरिकन सैन्याने आफ्रिकन किनाऱ्यावर पाऊल ठेवावे अशीच वेळापत्रकाची योजना दोस्त राष्ट्रांनी केलेली असावी. या योजनेला योजकांच्या कल्पनेपेक्षांहि अधिक प्रमाणांत यश आलें याचें आश्रर्य वाटतें. मार्शल रोमेल हा एवढा नाणावलेला सेनापति असतांना दोस्तांच्या आठव्या सेनेने त्याच्यावर अवचित हल्ला करून त्याला गोंधळांत पाडलें आणि त्याचा पुरा मोड केला हें अपूर्व नवल नव्हे तर काय ! रोमेलचें युद्धयंत्र बिघडलें आफ्रिकेतील वाळवंटांतल्या या लढायांत जयाचें पारडें अकल्पित रीतीनें इकडचें तिकडे फिरतें असा आतांपर्यंतचा दोन वेळचा अनुभव आहे, तेव्हां तिसऱ्यादि खेपेला अशीच आकस्मिक उलटापालट झाली असेल असे कित्येकांचे म्हणणे आहे. पण ते सयुक्तिक दिसत नाहीं. रोमेलची युद्धाची तयारी नव्हती असेंहि म्हणतां येत नाही, त्याने स्वतःच मागल्या महिन्यांत ब्रिटिश सैन्यावर चालून जाण्याच: एक प्रयत्न केला होता, पण तो अपेशी ठरल्याने ती नुसती शत्रुचें बळ चांचपून पाहण्याची चुणूक होती असे दर्शवून रोमेलला सारवासारव करावी लागली, त्या- वरून रोमेलच्या लढाईच्या यंत्रांत कांहीं तरी बिघडलें होतें अशी शंका येते. त्यानंतर कांही दिवस रोमेल आजारी पडून युरोपांत जाऊन आला. त्याच्या गैरहजेरीत ज्या सेनानीकडे तात्पुरतें आधिपत्य होतें त्यानें नीट बंदोबस्त ठेवला नाही अशी सबब सांगण्यांत येते. हा सेनापति व्हॉन स्ट्रोमे या युद्धांत मारला गेला, त्यामुळे या संबंधांत अधिक तपशील बाहेर येणे शक्य नाही. तथापि इटालियन व जर्मन युद्धबंदींची जी मोठी संख्या जाहीर झाली आहे आणि युद्धांत मृत्यु पावलेल्यांच्या