पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध महायुद्धाचा रंग पालटला [ अमेरिका महायुद्धांत सामील होऊन अकरा महिने झाले तरी अमे- रिकन सैन्याचा कोठेंच प्रभाव दिसून आला नाहीं, आणि उत्तर-आफ्रिकेंत तर जर्मन सेनापति रोमेल यानें ईजिप्तवर चढाई करून इंग्लंडचे नाक छाटण्याचा बाट घातला, तेव्हां चर्चिल व रूझव्हेल्ट यांनी आफ्रिकन किनाऱ्यावर एका सुर- क्षित स्थळी भेटून, आठ दिवस लष्करी तज्ज्ञांसह वर्तमान वाटाघाटी करून, भावी मोहिमेचें धोरण ठरविले आणि उत्तर-आफ्रिकेंत फ्रेंचांच्या मुलुखांत सैन्य उतरवून रोमेलला पिछाडीकडून शह द्यावा आणि ब्रिटिश सैन्यानें ईजिप्तमधून रोमेलच्या आघाडीवर हल्ला चढवून त्याचा मोड करावा, अशी योजना आंख- ण्यांत आली. ती योजना सफळ होऊन अमेरिकेचें ८ लक्ष सैन्य आफ्रिकेच्या उत्तर- किनाऱ्यावर उतरलें आणि तिकडे ब्रिटिश फौजेनें रोमेलचा पराभव करून त्याला मार्गे रेटलें. या डावपेचांनी महायुद्धाचा रंग पालटला असे भाकित या लेखांत केले असून ते भाकित खरें ठरलें; कारण या वेळेपासून गही राष्ट्रांची एकसारखी पीछेहाटच होत चालली. ] अमेरिका युद्धांत पडून अकरा महिने होत आले तरी अमेरिकेच्या सैनि कांचा प्रभाव कोठेंच व्यक्त झाला नव्हता; पण आतां उत्तर आफ्रिकेतील स्वारीचा मुख्य भार आपणांवर घेऊन अमेरिकेनें हिंमतीची चढाई सुरू केली आहे आणि गट्टी राष्ट्रांना गोंधळांत पाडले आहे. दोस्त राष्ट्र दुसरी आघाडी कोठे तरी सुरू करणार असे वारंवार सांगण्यांत येत होते आणि डिपे येथील अनुभवावरून फ्रान्सचा पश्चिम किनारा हा या आघाडीला सोयीस्कर नाहीं हें सिद्ध झालेच होतें. तेव्हां या दुसऱ्या आघाडीला आफ्रिकेत तोंड लागेल असे अनुमान करण्यास कांहींच हरकत नव्हती. अडचण एवढीच होती की, फ्रान्सच्या अव्याप्त प्रदेशांत पाऊल ठेवावयाचे म्हणजे फ्रान्सशी युद्ध सुरू करण्यासारखेच होणार, तेव्हां जो फ्रान्स जर्मनीच्या अर्धवट छायेखाली गेला आहे त्याला जर्मनीच्या गटांत पुरताच लोटल्या- सारखे होईल अशी वास्ती दोस्त राष्ट्रांस वाटत होती. परंतु फ्रेंच प्रधान लावल याचें धोरण दिवसेंदिवस जर्मनांना अधिकाधिक अनुकूल आणि दोस्त राष्ट्रांना प्रति- कूल असे होऊं लागल्यामुळे केव्हां तरी फ्रान्स उलटणारच, मग तो पुरता उलटण्या- पूर्वीच आफ्रिकेतील फ्रेंच किनाऱ्यावर सैन्य उतरविण्याचा फायदा कां बुडवा ( केसरी, दि. १७ नोव्हेंबर १९४२ )