पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" ब्रह्मदेश गेला, आसाम तरी नीट सांभाळा! हवाई हल्ला करणार, हे कोणीहि सांगू शकले असतें. तरी देखील ब्रिटिश सरकारने रंगून वगैरे शहरांचा पक्का वैमानिक बंदोबस्त केला नाही. रंगून पडल्यावर ब्रिटिश व हिंदी सैन्याच्या रसदीची वगैरे तजवीज व्हावी तशी झाली नाहीं. स्थानिक ब्रह्मी जनतेचा मनापासून पाठिंबा लष्करास मिळणे अवश्य होते तो खात्रीचा आणि योग्य प्रमाणांत लाभला नाहीं. वरातीमागून घोड्याप्रमाणे येणाऱ्या अमेरिकन विमानांनी व उडत्या किल्ल्यांनी जपाननें कबजांत घेतलेल्या शहरांवर बॉबहल्ले केल्यानें गेलेला देश साक्षात् परत घेण्याकडे कितपत उपयोग होईल? त्यापेक्षां ती विमानें नवी सरहद्द सांभाळण्यास उपयोगांत आणणे बरे नव्हे काय? जमनी व जपान यांस शह या याच्या उलट रशियांत काय स्थिति आहे पाहा. जर्मनीची वासंतिक चढाई सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी, जर्मनीची प्रगति पाहिल्याप्रमाणे होत नाही. इतकेच नाही, तर खारकोव्हच्या आघाडीवर रशियानें जर्मनीला कांहींसें मागेंच लोटले आहे व कर्चच्या सामुद्रधुनीच्या आघाडीवर जर्मनीची प्रगति मोठ्या जिकि- रीनें भरमसाठ सैन्य बळी देऊन मगच होत आहे. रशियन जनता युद्धांत अंतःकरण- पूर्वक सामील आहे हें याचें एक प्रमुख कारण होय. अखिल रशियांत सर्व जन- तेची राष्ट्रीय आघाडी लढाईस दंड थोपटून सज्ज आहे. या गोष्टींचाहि ब्रिटिश सरकारनें विचार केला पाहिजे. जिब्राल्टर काय व माल्टा काय, गट्टी राष्ट्रांनी अद्यापि घेतले नाहीं. लीबियांत उभयपक्षांची सैन्ये समोरासमोर जवळजवळ तुल्य- बल अशा अवस्थेंत ठाकलेली आहेत. दोस्त राष्ट्र बेंगाझी, गझाला या शहरांवर बाँबहल्ले करतात, तर जर्मन विमानें कैरो, अलेक्झांडिया या शहरांवर हवाई हल्ले चढ- वितात. लीबियांत कांहीं झालें तरी जर्मनीनें कॉकेशस, बाकू हा भाग काबीज केला तर हिंदुस्थानला त्या बाजूने धोका वाढणार असें खास समजले पाहिजे. दोस्त राष्ट्रांनी आयर्लंडमध्ये अमेरिकन, कॅनेडियन वगैरे सैन्य आणून ठेवले आहे. त्याच्या साहा- य्यानें युरोपमध्ये दुसरी आघाडी निर्माण केली व जर्मनीला मागून शह दिला तरच जर्मनीची रशियांत होणारी प्रगति अडविली जाईल. तसेंच अमेरिकन विमानांनी जपानवर एकदांच यशस्वी हवाई हल्ला केला, त्याचा पाठपुरावा मुळींच केला नाही. तसें न करतां ते हल्ले चालू ठेवले व वाढविले तरच जपानचें तोंड सध्यां जें ब्रह्म- देशावरून हिंदुस्थान, सिलोन यांच्याकडे वळले आहे तें थोडेसें तरी मागें फिरेल, दोस्त राष्ट्रांकडून यांपैकी कांहींच घडले नाही तर जर्मनी व जपान या दोघांच्या दोन दिशांकडून होणाऱ्या आक्रमणाच्या अडकित्त्यांत हिंदुस्थान सांपडेल; अशा कठीण परिस्थितीत हिंदुस्थानचें संरक्षण ब्रिटिश सरकारास करावयाचे असल्यानें त्यानें हाँगकाँग, मलाया, सिंगापूर, ब्रह्मदेश यांच्या युद्धांतील पराजयामुळे दृष्टो- त्पत्तीस आलेल्या लष्करी धोरणाच्या घोडचुका दुरुस्त कराव्या आणि हिंदुस्थानांत सरकार व जनता एकरूप आणि एकजीव करून जपानला निकरानें तोंड द्यावें.