पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध संस्था स्थापित झाली आहे. तिचें उद्घाटन करतांना या युद्धाचें 'पूर्व आशियाचें मोठें युद्ध असे वर्णन जपानी मुख्य प्रधान टोजो यांनी केले आहे, यावरून वरील तर्कास पुष्टि मिळते. मलायांतील घोडचुका दें अनुमान खरे ठरलें व हिंदुस्थानवरील जपानी हल्ला चार महिने लांबणीवर पडला, तर या संधिकालाचा भरपूर उपयोग करून, जपानी लढाईचा वणवा अमे- रिकेच्या पले बेटावर लागल्यापासून, ज्या चुका संयुक्त सरकारांच्या धोरणांत झालेल्या उघडकीस आल्या त्या दूर करण्याचा कसून प्रयत्न त्यांजकडून झाला पाहिजे. ब्रह्मी युद्धाच्या ब्रह्मघोटाळ्यापासून तर बराच बोध ब्रिटिश सरकारांस घेतां येण्यासारखा आहे. सिंगापूरच्या नजीक मलायांतील जोहोर संस्थानांत सर रिचर्ड विन्स्टेड या नांवाचे एक ब्रिटिश मुत्सद्दी सर्वसाधारण सल्लागार म्हणून होते. त्यांनीं ‘डेली टेलिग्राफ' या ब्रिटिश वृत्तपत्रांत एक पत्र परवा प्रसिद्ध केले आहे व त्यांत मलायांतील वस्तुस्थितीचें वर्णन केले आहे. “मलायांतील लोक मोठे धीराचे आहेत. ते कडवे देशभक्त आहेत. मलायाचें रक्षण करण्यास अवघ्या दोन रेजिमेंट्स होला. मग त्या लोकांनी आपले रक्षण कसे करावें ! त्या रेजिमेंट्स्बरोबर अधिकारी होते त्यास मलायाची माहिती नव्हती; त्या लोकांची भाषाहि त्यांस येत नव्हती. अधिक सैन्याच्या पलटणी मलायांत का उभ्या केल्या नाहीत, जाणते लष्करी अधिकारी कां तयार केले नाहीत, याचा इंपीरियल डिफेन्स कमि- टीनें जाब दिला पाहिजे. ब्रिटिश इभ्रतीस जबरदस्त धक्का बसला आहे. ज्यांचें संरक्षण करण्याची आपण हमी दिली व ज्यांस आपण वांचवूं शकलो नाहीं त्यांस नांवें तरी ठेवू नका. आपण ज्या देशास तोंडघशी पाडून जो देश सोडला व ज्याला जपानशीं सहकार्य करण्याची बतावणी कदाचित् करावी लागेल, त्यावर सूड घेण्याची कल्पना देखील मनांत आणूं नका. सर रिचर्ड यांच्या पत्राचा सारांश येणेंप्रमाणे आहे. त्यांत ब्रिटिश सरकारच्या भावी धोरणाच्या व हिंदुस्थानच्या संर- क्षणाच्या दृष्टीनें शिकण्यासारखें बोधामृत आकंठ भरलेले नाही काय ? वरातीमागून घोडें कशाला ? हें मलायाचें झाले. ब्रह्मदेशाच्या युद्धाची जी स्थिति लष्करी व राजकारणी अशा अधिकारी लोकांनी वर्णिली आहे, तिजवरून सुद्धां ब्रिटिश सरकारास वेळेवर शहाणे व्हावयाचें असेल, तर पुष्कळ शहाणपणा शिकतां येईल. ब्रह्मी युद्धांत दोस्तांची वैमानिक तयारी अगदी जुजबी होती. म्हणून रंगून, मंडालें, लॅशियो वगैरे महत्त्वाची केंद्रस्थानें शत्रूच्या आहारी लवकर गेली. रंगून गेलें तेव्हां सर्व ब्रह्मदेशाचें नाक कापलें गेलें असें झालें. मलाया जपानच्या राज्यांत समाविष्ट झाल्यावर व त्यांतील वैमानिक स्थानें शत्रूकडे गेल्यावर त्या स्थानांचा पुरेपूर उपयोग जपान करणार व ब्रह्मी शहरांवर