पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रह्मदेश गेला, आसाम तरी नीट सांभाळा ! फुशारकी नको, बोध शिका जपानी शिपाई हे कांही कोणी मानवी कोटीच्या बाहेरील अदमी नव्हत; त्यांची सायसंगीन सज्जता अधिक आहे इतकेंच; बाकी एका पातळीत ते व आमचे सैनिक उभे राहिले, तर आम्हीच त्यांस भारी आहोत, अशी फुशारकी ब्रिटिश लष्करी निरीक्षक व अधिकारी यांनी मारली आहे. तथापि ही फुशारकी विशेष अभिमानास्पद नाहीं. जपान्यांच्याइतकी सिद्धता करण्यास ब्रिटिशांचे कांहीं कोणी हात धरले नव्हते. ब्रह्मी आसामी सरहद्दीवर आम्ही कडेकोट बंदोबस्त केला आहे, आतां जपानची स्वारी आमच्याकडे वळली तर आम्ही तिला पूर्णपणे तोड देऊं, असेंहि त्या अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. ही त्यांची घोषणा सार्थ होवो, अशीच हिंदी जनतेची इच्छा असणार हे सांगावयास नको. परंतु नुसत्या शब्दा- विष्काराने आणि इच्छेनें कोणतेंहि उद्दिष्ट फलित होत नाहीं, हें सरकाराने व त्याच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नीट ध्यानी आणले पाहिजे व होंगकाँग, सिंगापूर, मलाया, ब्रह्मदेश यांच्या लढ्यांपासून जो बोध शिकावयाचा तो सत्वर शिकला पाहिजे. चिनी जनतेची उकडहंडी होईल ब्रह्मी युद्धाची इतिश्री करून जपानने आपला मोर्चा चीनकडे वळविला आहे असे दिसतें. हिंदी-ब्रह्मी-चिनी रस्ते जेवढे नवे-जुने असतील ते सारे बंद करून, मुख्यतः अमेरिकेकडून चीनला प्राप्त होणारा मदतीचा प्रवाह स्थगित करावयाचा व चोहोबाजूंनी नाकेबंदी करून चिनी जनतेची उकडहंडी करावयाची, असा जपानी लकराचा यापुढील डाव असावा. बाहेरून जमिनीवरून येणारी मदत संपणार; चिनी समुद्रकिनारा जपानी लष्कराच्या ताब्यांत आहेच; ब्रह्मदेशांत जपानी सैन्याच्या पांच पलटणी आहेत या युनान प्रांत जिंकावयास रवाना होत आहेत; फूच येथे जादा जपानी सैन्य सैन्यवाह जहाजांतून उतरत आहे; पेकियांग प्रांतांतून मार्शल चांग-कै-शेक यांच्या राजधानीच्या म्हणजे चुकिंगच्या रोखाने जपानी सैन्य कूच करीत चाललेच आहे! अशा रीतीनें सांप्रत पांच-सहा दिशांनी चीन देशावर जपानी सैन्य आक्रमण करण्यास निघालेले आहे. यावरून आतां गेली पांच वर्षे चिघळत अस लेलें चीनचें प्रकरण संपवावे, असा जपानी सरकारचा इरादा दिग्दर्शित होत आहे. आसाम, मणिपूर या भागांत आतां पावसाळा जोराचा सुरू होणार; यास्तव चार महिने तरी त्या भयंकर डोंगराळ व घनदाट जंगली भागांत 'सेनापति पर्जन्याच्या ' सैन्यधारांबरोबर दोन हात करण्याचें सोडून, आसाम-बंगालच्या सरहद्दीवर कांही महत्त्वाच्या भागावर तुरळक बाँबहल्ले करण्यापलीकडे आपण जास्त कांहीं करूं नये, असे जपानी लष्करी धोरणाच्या सूत्रचालकांनी योजिले असावें. चुकिंग शहर खाली करण्यांत येत आहे, असे चिनी तारच सांगत आहे. जपानमध्ये 'नॅशनल सव्हिस पोलिटिकल कौन्सिल' या नांवाची जपानी पार्लमेंटच्या सभासदांची एक नवी