पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध येतें, तें अतिशय विस्मयावह व उद्वेगजनक वाटतें. लष्करी अधिकारी त्या परि- स्थितीवर कितीहि रंगसफेती करोत व आपल्या अपुऱ्या लष्करी सज्जतेवर भषके- बाज पांघरूण घालोत; अशा वरपांगी उपायांनी खरें चित्र लपूं शकणार नाही. आज दोस्तांचे ब्रम्हदेशांत उरलेले सारें सैन्य हिंदी सरहद्दीकडे माघार घेतां घेतां चिंद- विन नदीवर कालेवा येथें तूर्त सुरक्षित स्थळीं तळ देऊन राहिले आहे. जपानच्या युद्धांत किती सैन्य बळी पडलें, किती सैन्य कैद झाले, त्याचे आंकडे इतक्यांत कळणे शक्य नाही. ही माघार अतिशय तडफेनें व कौशल्यानें घेण्यांत आली, सर्वच पीछेहाटी म्हणजे कांहीं पराभवात्मक नसतात. आमच्या सैन्याचें मनोधैर्य शाबूत आहे, अशी मखलाशी दोस्तांचे लष्करी अधिकारी करीत आहेत. या सैन्यांत अर्थात् हिंदी सैन्यच बहुसंख्य आहे. अशा स्थितीत या सारवासारवीनें हिंदी लोकांचे समाधान होणार नाही किंवा त्यांची दिशाभूलहि होणार नाही. मार्च- मध्ये रंगून पडल्यावर कसे तरी जपानी आक्रमण पावसाळ्यापर्यंत अधिक क्षेत्रांत पसरूं द्यावयाचें नाहीं इतकेंच ध्येय आम्ही ठेवले होते, असे सेनापति वेव्हेल म्हणतात व त्यांचे दुय्यम सेनापति अलेक्झांडर यांनीं तें काम उत्तम रीतीनें केले असे त्यांचं समर्थन करण्यांत येतें. हीच का चढाई ? परंतु तें तरी कितपत सावले आहे ? जपानी सेनेनें ब्रिटिश व हिंदी सैन्य आणि चिनी सैन्य यांची प्रथम ताटातूट केली. ब्रिटिश व हिंदी सैन्यास सर्व बाजूंनीं घेरून त्यास जपानी सेनेनें हिंदी सरहद्दीपर्यंत मागें रेटलें व चिनी सैन्याचा पराभव करून चीनच्या युनान प्रांतांत प्रवेश केला आहे, अशी आजची स्थिति आहे. हेच सेनापति अलेक्झांडर 'चढाई, चढाई, चढाई' असा विक्रमशाली जय- घोष करीत ब्रह्मदेशांत गेले होते व त्यांनी आपल्या सैन्याचें नेतृत्व स्वीकारले होते. मग त्यांचा जयघोष एकाएकी कसा जिरला याचें आश्चर्य वाटते ! रंगून गेल्यावर अलेक्झांडर यांच्या सैन्यास कुमक, रसद, अन्नपाणी यांचा जरूर तेवढा पुरवठा खुष्कीच्या मार्गाने कां करता आला नाहीं? या सैन्यास वैमा- निक संरक्षण जितके मिळावयास पाहिजे होते तितकें कां मिळू शकले नाहीं ! स्थानिक ब्रह्मी जनता सर्वस्वी राजानष्ट होती, ती फितूर झाल्याची जी बातमी पस- रली होती ती खोटी होती, असे ब्रह्मदेशचे निर्वासित गव्हर्नर दिल्लीस आल्यावर आपल्या भाषणांत म्हणाले होते. तरी 'ब्रह्मी लोक आमच्या सैन्याच्या पाठीत खंजीर खुपसण्यास तयार होतेच असा वर उल्लेखिलेल्या विलायतच्या बातमी- दाराने निर्देश केला आहे. यावरून ब्रह्मदेशच्या गव्हर्नरने व बहुधा इतर अधि काऱ्यांनीहि ब्रिटिश सरकारचा व लष्करी सेनानींचा ब्रह्मी जनतेच्या सहानुभूती- विषयी गैरसमज करून दिला असावा हे उघड दिसतें. ,