पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रह्मदेश गेला, आसाम तरी नीट सांभाळा ! ४१ सेवा हे दोनच आजचे अतिशय गंभीर व जिव्हाळ्याचे प्रश्न आपणांसमोर आहेत. सरकार, लोकाग्रणी व सामान्य जनता यांच्या सहकार्यानेच ते सुटू शकतील. तसे सहकार्य व्यवहारांत सिद्ध होवो व परिणामी सकळ होवो एवढीच आमची मना- पासून इच्छा आहे. ब्रह्मदेश गेला, आसाम तरी नीट सांभाळा ! [ दुसऱ्या महायुद्धांत जपान सामील होऊन त्यानें प्रथम सिंगापूर हस्तगत केलें आणि तेथून उत्तरेस कूच करीत करीत ब्रह्मदेशहि सगळा व्यापला. ब्रह्मदेशा- ची दुर्दशा करून जपानी सैन्य हिंदुस्थानांतील आसाम प्रांताच्या सरहद्दीनजीक येऊं लागलें. त्या वेळीं आसामचा तरी लष्करी बंदोबस्त नीट करून हिंदुस्थानवरील जपानी आक्रमण टाळण्याविषयींचा इशारा या लेखांत देण्यांत आला आहे. ] युद्धाची यथार्थ वार्ता प्रत्यक्ष युद्ध संपून गेल्यावर कांही दिवसांनी त्याची खरी हकीकत कोणत्या तरी रूपानें बाहेर येते, असा साधारण युद्धेतिहासाचा नियम आहे. त्याप्रमाणें सर्व ब्रह्मदेश आता प्रायः जपानच्या ताब्यांत जाऊन किरकोळ गनिमी काव्याच्या चकमकीखेरीज तेथील युद्ध संपुष्टांत आल्यावर त्या युद्धाची बऱ्याच अंशी यथार्थ स्थिति जनतेसमोर येऊं लागली आहे. विलायतेंतील 'डेलि टेलिग्राफ ' व 'मॉर्निंग पोस्ट' या वृत्तपत्रांचे वार्ताहर मि. मार्सलंड गँडर यांनी आसाम- ब्रह्मदेश या सरहद्दीवरून ब्रह्मी युद्धाचें समीक्षण करणारे पत्रक आपल्या पत्रांस पाठविले ते येथे नुकतेंच प्रसिद्ध झाले आहे. एका हिंदी युद्ध-निरीक्षकानेंहि आपल्या पाहणीचें इतिवृत्त जाहीर केले आहे. मि. गँडर यांनी जें समीक्षणपर पत्रक इंग्लंडांत पाठविलें, ते स्वतः सरसेनापति वेव्हेल यांच्याशी सल्लामसलत करूनच तयार केले असल्या- कारणानें सर्वस्वी अधिकृत समजण्यास हरकत नाही. या दोहोंशिवाय गेल्या आठवड्यांत कॉमन्स सभेत युद्धचर्चा झाली, तिच्या अनुषंगानें माजी युद्धमंत्री मि. होअर-बेलिशा यांनीहि ब्रह्मी युद्धाच्या स्थितीचें तशाच स्वरूपाचें चित्रण आपल्या भाषणांत केलें. ब्रह्मी युद्धाचें खरें चित्र वरील तीन साधनांच्या साहाय्यानें ब्रह्मी युद्धाचें जें चित्र कल्पनेपुढे काढतां ( केसरी, दि. २६ मे १९४२ )