पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध डगमगतां धीरमनस्कतेनें करीत राहिले पाहिजे. स्वावलंबी होऊन, स्वयंसेव कदलें सज्ज करून, मतभेद व यादवी यांचा नायनाट करून, एकदिल होऊन, शहरो- शहरी व गांवोगांवी लोकांस धीर देण्याचें व शांततारक्षण करण्याचें कार्य स्वार्थ- त्यागपूर्वक व सेवाबुद्धि सदैव जागृत ठेवून एकसूत्रीपणानें केलें, तरच हिंदी जन- तेचा तरणोपाय आहे. भयग्रस्त होऊन शहरें सोडून जाण्यानें अखिल भारताचा प्रश्न सुटणार नाही. तसेंच जनतेनें हेंहि लक्षांत ठेवावें की, ज्या गांवांचा किंवा बंदरांचा युद्धकार्याशी साक्षात् संबंध नाहीं, तीं गांवे किंवा बंदरें सोडून दुसरीकडे जाण्याचें कांहीच कारण नाहीं. गांवांतल्या गांवांत राहूनच अंतर्गत शांतता कशी राखतां येईल याचा विचार पुढान्यांनी करावा. सहकार्यानें हें राष्ट्र- व्यापी कार्य करण्याचा उत्तम मार्ग नेहमी अग्रगामी असणाऱ्या मुंबई शहरानें दाखवून दिला आहे. त्या शहरांतील सर्व पक्षांच्या व सर्व वर्गांच्या वजनदार पुढा- ज्यांनी मुंबईच्या शेरिफास मुलकी संरक्षणाचा विचार व योजना करण्याकरितां प्रातिनिधिक नागरिक-सभा भरविण्याची विनंति केली. तिला अनुसरून काल सोम- वारीच मुंबईस सभा होऊन योजनेचें काम चालू झाले आहे. इतर शहरांत व गांवांत अशाच तऱ्हेचे प्रयत्न होणें अगत्याचें आहे. स्थानिक संस्था, म्युनिसि- पालिट्या, जिल्हाबोर्डे, ग्रामपंचायती इत्यादि संस्थांनी स्थानिक संरक्षणाची सर्वपक्षीय संघटित योजना आंखण्याच्या कामीं आतां पुढाकार घेतला पाहिजे व सर्व जनतेनें एकोप्याने सहकार्य करण्यास पुढे आले पाहिजे. वर्धा येथें जी भारतीय काँग्रेस समितीची सभा झाली तीत यासंबंधी कांही आदेश संमत करण्यांत आले आहेत. त्यांत काँग्रेसव्यतिरिक्त स्वयंसेवक संस्थांशी व जरूर तर सरकारशी सह- कार्य करावे असे म्हटले आहे. या आदेशानुसार काँग्रेसचे अध्यक्ष मौ. अबुल कलम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू व राजगोपाळाचार्य यांची जी भाषणें होत आहेत त्यांतहि सर्व पक्षांशीं राष्ट्रीय सभेनें सहकार्य करण्यावरच मुद्दाम भर देण्यांत येत आहे. सहकार्य हाच तरणोपाय परंतु सांप्रतचा राष्ट्रावरील प्रसंग इतका 'तडातडी'चा आहे की, आतां सर्वानी पक्षाभिनिवेश स्थगित करून 'सहनाववतु, सहवीर्य करवावहै' असे म्हणण्याची पाळी आली आहे. सरकारशी सहकार्य करावयाचें कीं नाहीं, अमुक केलें कीं सहकार्य होतें कीं नाहीं, तमुक कृत्य केल्यानें पक्षाची निष्ठा राखली जाते की नाही, याची सूक्ष्म चिकित्सा करण्याची ही वेळ नव्हे. आपल्या आळीचे, गांवाचे, आपल्या जिल्ह्याचें, आपल्या प्रांताचें व आपल्या राष्ट्राचे संरक्षण करण्यास व आपल्या देशबांधवांस धीर देऊन, शांत राखून, त्यांचे रक्षण करण्यास आपण स्वयंसेवक या नात्याने काय करावें याचेंच चिंतन प्रत्येक सुबुद्ध व विचारी माणसानें केले पाहिजे व तत्संबंधी जे कर्तव्य त्यांस करतां येईल तें त्यानें नेटाने पार पाडले पाहिजे. राष्ट्राचें संरक्षण व जनतेची