पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विविध क्षेत्रांत सार्वजनिक कार्य केलें. सबब केसरी-मराठा संस्थेला त्यांचें 5. तैलचित्र अर्पण करावें. (7) (३) केसरीची प्रतिष्ठा ज्यांच्यामुळे वृत्तपत्र जगतांत वाढली अशा 22 आगरकर, टिळक, केळकर व खाडिलकर या थोर संपादकांच्या मालिकेंत बसणारे श्री. तात्यासाहेब करंदीकर हे आहेत. 'गीतातत्त्वमंजरी' व 'हिंदुराष्ट्रवाद' हे त्यांचे • उत्कृष्ट ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. भावी पिढ्यांना या ग्रंथांमुळे त्यांचा ग्रंथ लेखनाचा परिचय केव्हांहि होऊं शकेल; परंतु तात्यासाहेबांची अष्टपैल लेखणी जी चालली ती केसरीच्या स्तंभांत. गेल्मा सदतीस-अडतीस वर्षांत त्यांनी परराष्ट्रीय राजकारण, भारतीय राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष वगैरे अनेक विषयांवर विद्वत्तापूर्ण अग्रलेख वा इतर निबंध लिहिले. करंदीकरांच्या या संपादकीय लेखांचा परिचय अभ्यासकांना व्हावयाचा तर त्यांचे विविध विषयांवरील निवडक लेख पुस्तकरूपाने प्रसिद्ध होणे आवश्यक; म्हणून तसे प्रसिद्ध करावे. ही त्रिविध योजना साकार करण्याचे काम श्री. ओगले, नाईक, आपटे व कुलकर्णी यांनी मजवर सोपविली. जी योजना आंखली तिला ईशकृपेनें अल्पावधीत मूर्तस्वरूप आले आहे. सदर योजना अशी :- (१) पुणे विद्यापीठाची इंटर-कॉमर्सची परीक्षा निदान दुसऱ्या वर्गीत उत्तीर्ण होऊन अर्थशास्त्र या विषयांत सर्वांत अधिक गुण मिळविणाऱ्या व त्याच विद्या- पीठाच्या बी. कॉम्. परीक्षेचा अभ्यास चालू ठेवणाऱ्या विद्यार्थ्यास दोन वर्षेपर्यंत प्रतिमासीं रु. २५ ची शिष्यवृत्ति एक वर्षाआड देण्यांत यावयाची आहे. शिष्य- वृत्तीच्या विषयाची निवड आमच्या विनंतीनुसार श्री. तात्यासाहेबांनी केली आहे. (२) सुप्रसिद्ध चित्रकार श्री. ज. द. गोंधळेकर यांच्याकडून श्री. तात्यासाहे- बांचें तैलचित्र करवून घेतले आहे. (३) पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याकरितां विविध विषयांवरील लेखांची ३. निवड करून देण्यास व त्या लेखांची पार्श्वभूमि दर्शविणाऱ्या टीपा लिहिण्याची विनंति श्री. तात्यासाहेबांना केली, ती त्यांनी मान्य केली. या व यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या लेखसंग्रहांतील लेखांची निवड श्री. तात्यासाहेबांनी केलेली आहे. त्यांनी • लेखांची निवड कोणत्या दृष्टीने केली माचेंहि विवेचन त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेंत आले आहे. केसरीचे विद्यमान संपादक श्री. ग. वि. केतकर यांनी 'केसरीचे दक्ष आणि साक्षेपी संपादक' या प्रास्ताविक लेखांत श्री. करंदीकरांच्या संपादकीय कार्याचा धांवता आढावा घेतला आहे. वर निर्देश केलेली त्रिविध सन्मान योजना फलद्रूप होण्यास ज्यांनी ज्यांनी साहाय्य केले त्या सर्वांचा मी आभारी आहे. केसरी-मराठा कचेरी, आस्माराम राघजी भा, संयोजक. पुणे २. 20 }