पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सविनय निवेदन केसरी-मराठा संस्थेचे विद्यमान विश्वस्त व 'केसरी'चे माजी संपादक श्री. जनार्दन सखाराम ऊर्फ तात्यासाहेब करंदीकर यांचे चहाते व विद्यार्थी यांच्यावतीनें तात्यासाहेबांच्या (१) महायुद्ध व परराष्ट्रीय राजकारण, (२) देशांतील राजकीय घडामोडी, (३) आर्थिक व्यवहार व (४) संपादकीय धोरण या विषयांवरील केसरीतील निवडक लेख व निबंध पुस्तकरूपाने वाचकांना सादर करतांना मला आनंद होत आहे. श्री. तात्यासाहेबांच्या इतिहासविषयक, सांस्कृतिक, ज्योतिषविषयक व इतर निवडक लेखहि असेंच पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. त्याची किंमत पृष्ठसंख्येच्या मानानें ठेवण्यांत येईल. हे निवडक लेख नि निबंध यांचे प्रसिद्धीकरण हा, तात्यासाहेबांचे चहाते व विद्यार्थी यांच्यातर्फे त्यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी त्यांचा सन्मान करण्याची जी योजना आंखली आहे त्याचा एक भाग आहे. १९४६ च्या जुलैअखेर श्री. तात्यासाहेब करंदीकर हे 'केसरी'च्या संपा दकीय कार्यातून निवृत्त झाले. त्या वेळी केसरी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार झाला. त्या समारंभाची निमंत्रणें इतरांबरोबर तात्यांचे समर्थ विद्यालयांतील दोन शिष्य श्री. शंकर प्रभाकर ओगले ( म्हैसूर ग्लास अँड एनामल वर्क्स लि. ) व नारायण गोविंद नाईक ( श्रीराम सिल्क मिल्स लि. ), तसेच श्री. गोपाळ दत्तात्रय आपटे, ऑडिटर व श्री. रामकृष्ण गोविंद कुलकर्णी (सदर्न निटिंग वर्क्स लि. ), यांना गेलीं होतीं. पुढें कांहीं कामानिमित्त आम्ही एकत्र आलों असतां केसरी मराठा संस्थेतर्फे झालेल्या समारंभासंबंधी बोलणे निघालें व तात्यांचे विद्यार्थी नि चहाते यांच्यातर्फे त्यांचा • सन्मान योग्य समय साधून करावा असा विचार निघाला. सात-आठ महिन्यांपूर्वी पुनः आम्ही एकत्र आलों असतां तात्यांचे हे पंचाहत्तरावें वर्ष पूर्ण होत असल्यानें त्यांच्या शहासराव्या वाढदिवशी त्यांचा सन्मान करावा असे आम्हीं योजिलें. सदर सन्मानाची जी त्रिविध योजना क्रमशः तयार झाली ती अशी :- (१) श्री. तात्यासाहेब करंदीकर यांनी आपल्या आयुष्याला प्रारंभ केला तो प्रथमतः मुधोळ हायस्कुलांत शिक्षक म्हणून त्यानंतर त्यांनी कै. गुरुवर्य अण्णा- साहेब विजापूरकरांच्या आद्य समर्थ विद्यालयाला वाहून घेतलें. तें विद्यालय सर कारच्या दडपशाहीमुळे बंद झाल्यानंतर त्यांनी पुण्यास येऊन विद्यालयांतील विद्यार्थ्याचें शिक्षण पुरे करून दिले. त्यानंतर ते केसरी-मराठा संस्थेत आले व केसरी- द्वारा त्यांनी लोकशिक्षणाचेंच कार्य केले. या दृष्टीने त्यांच्या या शिक्षणविषयक कार्याला योग्य असा त्यांचा गौरव करण्याकरितां त्यांच्या नांवे पुणे विद्यापीठांत शिष्पवृत्ति वा पारितोषिक ठेवावें. (२) श्री. तात्यासाहेब १९१२ मध्ये केसरी-मराठा संस्थेत दाखल झाले व