पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध ब्रिटिश वृत्तपत्रे व जबाबदार हिंदी पुढारी, हिंदी प्रश्न ताबडतोब सलोख्याने सोडवा, असें एकसारखें आग्रहपूर्वक प्रतिपादन करीत असतांहि, ब्रिटिश सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीं. रशियन जनता व चिनी जनता हातावर शीर घेऊन हिरीरीने आपआपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढत आहे. तशीच स्फूर्तिदायक भावना हिंदी जनतेंत उत्पन्न होईल असे करा, अशी मागणी सरकारकडे केली गेली असतां तिचा बिनदिक्कत अव्हेर केला जात आहे. मध्यवर्ति राज्यकारभारांत राष्ट्रीय सरकार अधिकारारूढ करा, अशी मागणी नेमस्त मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यांनी सरकारकडे केली तरी तिचाहि स्वीकार होत नाहीं ! चिनी सैन्य हिंदभूमीवर लढण्यास आणले जातें; ऑस्ट्रेलियन लष्करी अधिकारी हिंदी पलटणींत नेमले जातात; सर्व देशांना अटलांटिक सनद लागू, पण हिंदुस्थानला मात्र ती लागू नाहीं, असा नकार देण्यास सरकारला दिक्कत वाटत नाहीं ! युद्धकाल असून सीरियाला स्वातंत्र्य दिले जातें व नव्या अँग्लो- पर्शियन तहानें इराणी स्वातंत्र्याचा आदर करून त्याच्या रक्षणाची हमी घेण्यांत येते; पण हिंदुस्थानला स्वातंत्र्य न देण्यांत युद्धकालाची सबब खुशाल वारंवार पुढें करण्यांत येते ! मुलकी रक्षणाची योजना तथापि आजचा तो मुख्य प्रश्न नाहीं. बिनलष्करी हिंदी जनतेचें संरक्षण व धारणपोषण करण्याकरितां सरकार काय करीत आहे व त्याने काय करावे हा आजचा प्रश्न आहे. हिंदुस्थानांत शांतताभंग झाला, बंडाळी माजली, अराजक निर्माण झाले तर त्याचा प्रतिकार करण्याकरितां सरकारने काय योजना केली आहे, यासंबंधी परवा दि. १४ रोजी मध्यवर्ति लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत प्रश्न विचारण्यांत आले. त्यास गृहमंत्री सर रेजिनॉल्ड मॅक्सवेल यांनी उत्तर दिले की, राज्यरक्षणकानू व इतर खास कायदे व वटहुकूम त्यांच्यायोगे सरकारने आवश्यक ती व्यापक सत्ता आपल्या हाती घेतली आहे; मुलकी संरक्षणखातें स्वतंत्र रीतीने सुप्रतिष्ठित कर- ण्यांत येत आहे; जनतेचें मनोधैर्य अचल राखण्याचा प्रयत्न ते खातें करीत आहे; तीस हजार जादा पोलीसभरती करण्यांत आली आहे. शिवाय पांसष्ट हजार नगर- रक्षक आहेतच; फितुरी हुडकून काढण्याची खबरदारी घेण्यांत येत आहे; प्रांतास व स्थानिक अधिकान्यांस जरूर ते विशेष हक्क देण्यांत आले आहेत. अशी ही संरक्षणाची योजना असल्याचे गृहमंत्री मॅक्सवेल यांनी निवेदन केले. हिंदु- स्थानचा अफाट विस्तार व त्याची निःशस्त्र चाळीस कोटि जनता यांचा विचार केला, तर ही योजना अगदी अपुरी आहे असे म्हटल्याखेरीज गत्यंतर नाही. जीवनाच्या गरजा भागवा येथल्या येथें भरपूर हिंदी लष्कर उभारून ते देशरक्षणास सायसंगीन व