पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध सिंगापूर पडलें; आतां तरी कर्तव्य-मार्गाला लागा ८. [ जपानी योद्धयांनीं सिंगापूर हस्तगत केल्यानंतर पूर्वेकडील प्रदेशांत जो धोका निर्माण झाला त्याचें यांत वर्णन असून अशा संकटकालीं सरकारनें व प्रजाजनांनींहि आपआपलें कोणतें कर्तव्य जागरूकतेनें करावें याविषयीं या लेखांत इशारा दिलेला आहे. त्यांत सरकारने जनतेला विश्वासांत घेऊन आणि राष्ट्रीय. मंत्रिमंडळ बनवून स्वराज्याच्या मार्गाकडे पावले टाकावीं ही अशी विधायक सूचना आहे. तशीच जनतेनेंहि निष्कारण घबराट न वाढवितां एकदिलानें स्वसंर- क्षणार्थ स्वयंसेवक-दलें उभारून आत्मसंरक्षणार्थ सज्ज राहावें अशीहि विधायक सूचना आहे. ] युद्धाची परिस्थिति रोजच्या रोज अधिकाधिक घोर व चिंताजनक होत चालली आहे. पॅसिफिक महासागरांत जपाननें चढाई सुरू केल्यापासून त्याचा पाय मुळीं मागें आलाच नाही म्हटले तरी चालेल. 'मी आलों, मी पाहिले, मी जिंकलें * असें सीझरच्या विजयपरंपरेचें इतिहासप्रसिद्ध वर्णन आहे, तेंच आज प्रायः जपा- नास लागू पडत आहे. बेफिकीर, नालायक, कर्तव्यच्युत अमेरिकन लष्करी व वैमा- निक अधिकाऱ्यांच्या घोडचुकीमुळे पर्ल बंदरांतील आरमार जपान्यांनी बुडविलें, तेव्हांपासून एकामागून एक प्रचंड विजय जपान संपादन करीत आहे. 'रिपल्स्' व ‘ प्रिन्स् ऑफ वेल्स्' या ब्रिटिशांच्या जंगी बोटी जवळजवळ कागदाच्या होड्यां- प्रमाणें बुडाल्या. हाँगकाँग पडलें, तेव्हांच ब्रिटिशांच्या साम्राजाला धक्का बसला व त्यांच्या नाविक सार्वभौमत्वाचा फुगा फुटला. मलाया जाऊन आतां सिंगापूर, की जे ब्रिटिश साम्राज्याचे पॅसिफिक महासागरांतील नाक म्हणून नांवाजलेले. होतें तेंच, दांती तृण धरून जपानला शरण गेल्याचें वृत्त आले आहे. जपानी मोर्चा कोणीकडे वळणार ? सिंगापूर तर शत्रूच्या हाती गेलेंच, पण त्याचे परिणाम किती दूरवर पोंच- णार याची नक्की अटकळ आजच करता येणे शक्य नाहीं. तथापि सिंगापूर हातचें गेल्यानें पॅसिफिक महासागर जपानी आरमारास स्वैरसंचारास मोकळा सांपडला हें खरेंच. शिवाय यानंतर जावा, सुमात्रा इत्यादि बेटें काबीज करून जपान आपल्या युद्धसामुग्रीच्या पुरवठ्याच्या जागा, वैमानिक हल्ला करण्यासाठी लागणारी केंद्रे वगैरे बाबतीत जास्त सुसज्ज होणार असे उघड दिसतें. सिंगापूर पडल्या- - ( केसरी, दि. १७ फेब्रुवारी १९४२ )