पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध व ३४ असे दिसूं लागल्यापासून जपानला आपला दक्षिणेकडचा रस्ता रोखला जाणार हे कळून आले आणि त्या वेळेपासून जपान हा युद्धाचें कांही तरी खुसपट काढण्याची संधि पाहात होता. ती संधि त्याला आतां मिळाली व तिचा त्यानें शक्य तितका फायदा झटपट करून घेण्याचा डाव साधला. उभय पक्षांच्या बलाबलाची तुलना युद्ध जाहीर करण्याच्या आधीच अगाऊ आरमार पाठवून जपानने अमे- रिकेच्या पर्ल बंदराचा धुव्वा उडविला, वेक बेट हस्तगत केलें, ग्वाम वेढलें, मॅनि- लांत सैन्य उतरविलें, थायलंडला शरण यावयास लावलें, मलायांत प्रवेश केला आणि सिंगापूर येथें तर प्रिन्स ऑफ वेल्स व रिपल्स यांसारखी जंगी लढाऊ जहाजें बुडवून ब्रिटिश आरमारांत हाहाकार पसरविला. तरी पण शत्रु बेसावध असतांना मिळविलेले जय कितपत पचतील याची वानवाच आहे. अमेरिकेजवळ १५ लढाऊ जहाजें, ३५ क्रूझर्स, ५ विमानवाहक जहाजें, १७६ विनाशिका आणि ११५ पाणबुड्या आहेत. इंग्लंडचें आरमार यांच्याहूनहि अधिक आहे. मात्र ते सगळे पॅसि- फिक महासागरांत एकदम येऊं शकत नसल्यानें पॅसिफिक महासागरांतील युद्धांत इंग्लंडचें आरमार एकाच वेळी केवढे येईल हे निश्चित सांगतां येत नाही. अमेरिकेच्या आरमाराचे जे आंकडे दिले आहेत तेहि अटलांटिक व पॅसिफिक दोनहि मिळूनच आहेत. तथापि अमेरिका आपल्या आरमाराचा अधिकांत अधिक भाग पॅसिफिकमध्ये आणूं शकेल असे समजून चालण्यास हरकत नाहीं. अशा या संयुक्त आरमाराला तोंड देण्याला जपानजवळ १० लढाऊ जहाजें, ३० क्रूझर्स, १२२ विनाशिका, ८ विमानवाहक जहाजें अशी सामुग्री आहे. जपानच्या पाणबुड्या किती आहेत, याचा नक्की आंकडा जपाननें कोणास कळू दिलेला नाही. विमानांची संख्या ही कोणत्याच राष्ट्राची आज निश्चित सांगता येत नाही. कारण युद्धांत रोज विमानांची नासधूस सुरू आहे आणि नवीन विमानें बांधण्याचे कामहि सगळ्या देशांत चालूच आहे. अशा परिस्थितीत या युद्धाला यापुढे रंग कसा चढेल तें पाहूं. ब्रह्मदेशावर जपानचा डोळा पॅसिफिक महासागरांतील बेटे काबीज करणें हेंच कांहीं जपानचें ध्येय नाहीं. जपानमधील वाढत्या लोकसंख्येसाठी जपानला हीं बेटे हवींच आहेत. पण त्या बेटां- तून जपानची औद्योगिक गरज भागविली जाणार नाहीं. जपानला पेट्रोल, तांबे, शिसे, कथील, रबर इत्यादि अनेक वस्तु पाहिजेत. त्या सगळ्यांचा पुरवठा होण्याचा प्रदेश म्हणजे ईस्ट इंडीज बेटें होत. त्याकरितां त्याला मलाया द्वीपकल्प आणि डचांच्या ताब्यांतली बेटे पाहिजे आहेत व त्या बेटांत प्रवेश मिळावा म्हणून जपाननें हें युद्ध सुरूं केले आहे. सिंगापूरचा ब्रिटिशांचा तळ या मार्गात आडवा येतो, म्हणून सिंगापूरवर हल्ला करण्याची जपाननें तांतडी केली आहे. पेट्रोल व इतर अनेक खनिज द्रव्ये