पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जपानी चढाईचा परिणाम व अमेरिकेत आगाऊ कळूं नये ही केवढी नामुष्कीची गोष्ट ! शत्रूनें कपटयुक्तीनें फसवूं नये हा वेदान्त ठीक आहे; पण शत्रु कपट करील असे समजून आगाऊ सावध असावें असा राजनीतीचा दंडक असतांना त्याच्याकडे या बलाढ्य राष्ट्रांचें दुर्लक्ष कसें झालें ? ३३ जपानला अनुकूल व प्रतिकूल गोष्टी अमेरिका व इंग्लंड यांनी जपानच्या हालचालींकडे दुर्लक्ष केले त्यांतच मोठी गोम आहे. या उभयतांची समजूत अशीच झालेली दिसते की, आम्ही एवढे बलाढ्य आणि आमचें संयुक्त आरमार सगळ्या जगांत अत्यंत प्रबळ, असे असल्यानें आमच्याविरुद्ध युद्ध पुकारण्याची जपानची छातीच होणार नाही आणि जर त्यानें युद्ध पुकारण्याची घोडचूक केलीच तर आपण त्याला हां हां म्हणतां चीत करूं. ही स्वसामर्थ्याची कल्पना स्वाभाविक असून ती त्या राष्ट्रांच्या सामर्थ्याला शोभण्या- सारखीच आहे. पण यांत गोम एवढीच आहे कीं, युद्धाचें क्षेत्र जपानला कोण- कोणत्या बाबतींत अनुकूल आहे याचा या बलाढ्य राष्ट्रांनी तितका बारकाईनें विचार केलेला दिसत नाहीं. जपाननें पुकारलेले हे महायुद्ध मुख्यतः पॅसिफिक महासागराच्या उत्तर भागांतच लढले जाणार. हा प्रदेश जपानला चढाई करण्याला सोयीचा आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन्फ्रान्सिस्को बंदरापासून तो चीनच्या शांघाय बंदरापर्पत जो अफाट महासागर पसरलेला आहे त्यांतच अमेरिकेच्या ताब्यांतली होनोलुलु, हवाई, मिडवे, वेक, ग्वाम, अशीं बेटे पूर्वपश्चिम पसरली आहेत. यांतील मिडवे, वेक व ग्वाम हीं बेटे अमेरिकेपेक्षां जपानलाच अधिक जवळ आहेत. अमेरिकेच्या संरक्षणाखाली अस लेली फिलिपाइन बेटे तर जपानला विशेष नजीक आहेत; पण याच्यापेक्षां महत्त्वाची गोष्ट ही कीं, याच फिलिपाइन बेटांच्या चारहि बाजूला जपानच्या ताब्यांतील बेटांनी वेढा दिला आहे. उत्तरेस फोर्मोसा, पश्चिमेस स्प्राटली, दक्षिणेस पालम, आणि पूर्वेस याप अशा बेटांनी फिलिपाइन बेटाला गराडा घातला आहे. त्यामुळे फिलिपाइन बेटावर हल्ला करणे जपानला अगदी सुलभ असून त्याचा बचाव करण्या- करितां अमेरिकेला हजारों मैल अंतरावरून चाळून यावे लागणार. फिलिपाइन बेटांचा बचाव करणे सोपे व्हावे म्हणून अमेरेकेनें होनोलुलु व हवाई या दोन बेटांत आपले आरमारी तळ व वैमानिक तळ अलीकडे आणून ठेवले आहेत. ग्वाम बेट हे फिलिपाइन्सला अधिक जवळचें असल्यानें त्या बेटांची तटबंदी करावी आणि तेथेंच अमेरिकेच्या युद्धाचा तळ ठेवावा, असे अमेरिकन सरकारनें योजिलें होतें. या ग्वाम बेटाच्या तटबंदीवरूनच प्रथम जपान व अमे- रिका यांची धुसफूस सुरू झाली. इंग्लंडनें सिंगापूरचा तट बळकट करण्याची काम- गिरी सुरू केली आणि अमेरिका ग्वाम बेटालाहि दुसरं सिंगापूर करूं पाहात आहे, क. ले. ३