पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध जारीने सुरू आहे, आणि दिवसेंदिवस इंग्लंडचें चतुरंग बळ सिंगापूर व हाँगकाँग या बाजूनें जमत आहे, असे पाहिल्यावर जपानला साहजिकच असे वाटले असावें कीं, युद्धांत जर पडावयाचेंच तर प्रतिपक्षाचें सामर्थ्य वाढण्याच्या आधींच पडणें बरें ! इंग्लंड व अमेरिका यांनी जपानचा जो व्यापारी कोंडमारा चालू केला, त्या कारणामुळे जपान इतक्या लवकर युद्धांत सामील झाला. आपला व्यापारी कोंडमारा झाल्यामुळे आपले रणसाहित्य वाढविण्याची शक्ति संपुष्टांत येणार आणि दुसरीकडे प्रतिपक्षाची रणसामुग्री रोजच्यारोज वाढत जाणार, हे कोणता रणपंडित उघड्या डोळ्याने पाहात राहून हालचाल न करतां स्वस्थ बसेल ? अर्थातच युद्धांत न पडल्यानें जितका धोका आहे त्यापेक्षां युद्धांत पडल्याने कमी धोका आहे असें जपानी युद्धविशारदांना वाटल्यावरून रशियाच्या नाड्या अगदींच आंखडण्याची वाट पाहात न बसतां जपाननें युद्ध पुकारले असावें. अमेरिकन खलित्याचा स्वाभाविक परिणाम युद्ध पुकारावयाचें हें एकदां निश्चित झाल्यावर त्यांत आपली बाजू ज्या रीतीनें अधिकांत अधिक बलिष्ठ होईल त्या रीतीचा अवलंब कोणीहि युद्धशास्त्रज्ञ स्वाभाविकपणेंच करतो. तेव्हां जापान नें एकीकडे समेटाची बोलणी चालू ठेवली आणि दुसरीकडे आपलें लढाऊ बळ युद्धक्षेत्रांत पाठविण्याची अगाऊ तरतूद केली याचें आश्चर्य मानण्याचें कारण नाहीं. जपाननें आपल्या देशाच्या बाहेर कोणी कडेहि हातपाय पसरूं नयेत, चीनमधलें आपलें सैन्य काढून घ्यावें, इंडोचायनांतलें लष्कर परत बोलवावें आणि पॅसिफिक महासागरांत अमेरिका व इंग्लंड यांनी जीं बेटे आक्र मिलीं आहेत त्यांच्याकडे वांकड्या नजरेने पाहूं देखील नये, असा पायबंद घालून घेण्याचें जपान मान्य करील अशी ब्रिटिश व अमेरिकन मुत्सद्दयांनी आपली समजूत कां करून घ्यावी हेच कळत नाहीं ! प्रे. रूझवेल्ट यांनी जपानकडे जो खलिता पाठ- विला तो पाठवितांनाच त्यांच्या हे लक्षांत यावयास पाहिजे होतें कीं, मानी व मह ज्वाकांक्षी जपान या अटी सहसा मान्य करणार नाहीं. त्या खलित्याचें असें भवितव्य गाऊ जाणून जर ब्रिटिश व अमेरिकन मुत्सद्दी सावध राहिले असते व युद्धार्थ डोळ्यांत तेल घालून सज्ज झाले असते तर कपटी जपा- ननें आम्हांस हातोहात सपशेल फसविलें असें म्हणून मनगटें चावण्याची त्यांच्या- वर पाळी आली नसती. युद्ध पुकारण्याच्या आधी जपानने पहिली गोळी झाडली असेल; पण जपान गोळी झाडण्याची अशी तयारी करीत आहे याची दखलगिरी घेण्याला तरी इंग्लंडला व अमेरिकेला आंतरराष्ट्रीय कायद्यानें बंदी केली नव्हती ना ! जपानचें आरमार हवाई बेटापर्यंत पोचण्याला आठ-दहा दिवस तरी लागले असतील. पण जपानची अशी तयारी चालली आहे आणि त्याचें लढाऊ आरमार व आगलावी विमानें जपानच्या किनाऱ्यावरून निघाली आहेत ही वार्ता इंग्लंडांत