पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जपानी चढाईचा परिणाम ३१ केव्हां शिरतील याचा नेम नाहीं. पॅसिफिक महासागरांतील बेटे आणि ऑस्ट्रेले- शिया हा सर्व भूभाग युद्धक्षेत्रच बनला आहे. अशा रीतीनें हैं महायुद्ध जगभर पसरल्यासारखेच झाले आहे. त्याचा एवढा विस्तार होण्याला जपानच जबाबदार आहे. जर्मनीच्या युद्धघोषणेमुळे सुरू झालेली लढाई कितीहि भयंकर स्वरूपाची असली तरी ती युरोपच्या चतुःसीमेंतच मर्यादित होती. इटालीनें युद्धांत पाऊल टाकून ती आग आफ्रिका खंडांत पसरविली आणि आतां जपाननें आशिया, अमे- रिका व ऑस्ट्रेलेशिया अशा तीन खंडांत तिचा प्रसार केला. याचा परिणाम कोण- कोणत्या देशावर कसकसा होणार आहे याचा विचार करणे अगत्याचें आहे. हिंदु- स्थानशीं या युद्धाचा अतिनिकट संबंध येत असल्यामुळे हिंदुस्थानांतील लोकांचें लक्ष आतां या युद्धाकडे पूर्वीपेक्षां शतपटीने अधिक वेधले जाईल यांत शंका नाहीं. जपाननें हीच वेळ कां पसंत केली महायुद्ध सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच जर्मनी व इटाली या देशांशी जपानची गट्टी जमली होती. आणि स्वाभाविकपणे ज्या युद्धांत जर्मनी व इटाली समाविष्ट झाले त्यांत जपान सामील होणार अशीच अपेक्षा सर्वांची होती. परंतु जपानचे मुत्सद्दी विशेष कावेबाज व दूरदर्शी असल्याने आपण युद्धांत पडावें कां नाही, आणि पडावयाचें झाल्यास कोणती पर्वणी साधून युद्धांत पडावयाचें याचा ते अतिबार- काईनें विचार करीत होते. आणि जेव्हां जपानी मुत्सद्दयांना असे वाटू लागले की, जर्मनीच्या चढाईमुळे रशियाच्या नाड्या आंखडत चालल्या आहेत आणि या युद्धांत पाऊल टाकल्यास आपल्याला रशियापासून भीति नाही, अशी त्यांची खात्री झाली तेव्हांच जपाननें युद्धांत पडण्याचें धाडस केलें. रशियाची शक्ति क्षीण झाली हे जसें जपानला युद्धांत पडण्याला एक कारण झालें, तसेंच उलटपक्षी अमेरिका व इंग्लंड यांची शक्ति पॅसिफिक महासागरांत दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालली हि एक जपानला आतांच युद्धांत पडण्यास कारण झाले असावें. लेलिनग्राड आणि मॉस्को या दोन्ही जुन्या नव्या राजधान्या जर्मनीनें काबीज केल्यानंतर आपण युद्धांत सामील व्हावें असें जपाननें मनांत योजलें होतें. कारण तसे झाले असतां रशियाची भीति पूर्णतः दूर होईल असें त्यास वाटत होतें. परंतु या राजधान्यांनी अंदाजाहून अधिक काळ टिकाव धरला आणि थंडीच्या कडाक्यामुळे जर्मनीचीहि गति मंदावली. त्यामुळे या राजधान्या पडे- पर्यंत वाट पाहावयाची तर बराच काळ कंठावा लागेल आणि तेवढ्या अवधीत इंग्लंड व अमेरिका आपले युद्धबळ पुष्कळ पटींनी वाढवितील आणि पॅसिफिक महासागराचा चोहों बाजूंनी पक्का बंदोबस्त करून आपल्याला पुरतेपणी वेढून टाक- तील, अशी जपानला धास्ती वाटू लागली. अमेरिकेत युद्धसामुग्रीचे कारखाने जोरांत चालू आहेत, नवीन आगबोटी व विमानें बांधण्याकरितां कामहि TAN1334