पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध ३० जपानी चढाईचा परिणाम [ जपाननें दि. ५ डिसेंचरला पर्ल बंदरावर अचानक हल्ला करून अमे- रिका व इंग्लंड यांच्याविरुद्ध युद्धाचा पुकारा केला. त्या वेळेपासून एक आठ- वड्यांत ज्या हालचाली झाल्या त्या लक्षांत घेऊन महायुद्धाचा हा वणवा आतां त्रिखंडांत पसरेल असें भाकित या लेखांत केले आहे. जपाननें कपटानें आकस्मिक हल्ला केला हें खरें असले, तरी अमेरिकेला जपानचा डाव अगाऊ ओळखतां आला नाहीं यांत तिची अदूरदृष्टिच दिसतें असें दर्शविलें असून, जपानचा मुख्य कटाक्ष मलाया, ब्रह्मदेश व ईस्ट इंडीज बेटें काबीज करण्याकडे आहे व त्या भूभागांतच प्रथम युद्धाची रणधुमाळी माजेल असे अनुमान काढले आहे. ब्रह्मदेशावर धाड आल्यानें हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर युद्ध येऊन ठेपेल, याकरितां ब्रिटिश सरकारनें हिंदुस्थानच्या स्वराज्याचा प्रश्न लवकर सोड- वावा, नाहीं तर पश्चात्ताप करण्याची पाळी येईल, असा इशाराहि या लेखांत दिला गेला आहे. ] तीन खंडांत युद्धाचा प्रसार जपाननें इंग्लंड व अमेरिका यांच्याशी युद्ध सुरू झाल्याची घोषणा करून महायुद्धाच्या ज्वाला दाही दिशांनी पसरविल्या आहेत. उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थानें युद्धांत ओढलीं गेल्यानें गाडीबरोबर नळ्याची यात्रा या न्यायानें दक्षिण- अमेरिकेंतील संस्थानेंहि आपोआपच युद्धांत सामील झाल्यासारखींच आहेत. त्यांतील कांहीं संस्थानें प्रत्यक्ष युद्धांत भाग घेतील, कांहीं थोडीं तटस्थ राहतील, तरी पण द० अमेरिकाहि युद्धांत समाविष्ट झाली असे म्हणण्यास हरकत नाहीं. युरोप खंडांत तर एक-दोन राष्ट्रांखेरीज इतर सगळी राष्ट्र आधीपासूनच युद्धांत गोंवली गेली आहेत. आशिया खंडांत युद्धाच्या ज्वाला दूरवर पोंचल्या नव्हत्या; पण जपाननें आतां तेवढी कामगिरी केली आणि त्रिखंडभर पसरेल एवढी युद्धाची आग पेटविली. • तुर्कस्तान, अफगाणिस्तान, अरबस्तान, इत्यादि मुसलमानी राष्ट्रांचा मधला गट तेवढाच युद्धापासून अलित राहिल्यासारखा आहे; पण त्यालाहि केव्हां तरी झळ लागल्याशिवाय राहणार नाहीं असे वाटते. जपानच्या युद्धघोषणेनें समरभूमि हिंदुस्थानच्या अगदी दारापर्यंत येऊन भिडली आहे आणि यापुढे हिंदुस्थानच्या पूर्वेकडील भागांत युद्धाच्या ज्वाला ( केसरी, दि. १२ डिसेंबर १९४१ )