पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राशियांतील रणसंग्रामाचा आढावा २९ करावी लागेल. याकरितां बल्गेरियाची बंदरें आणि त्या देशाचें आरमार आपल्याला मिळावें म्हणून जर्मनीची खटपट चालू आहे. बल्गेरियावर एकीकडून जर्मनीचें व दुसरीकडून रशियाचें दडपण आल्याने त्या देशाची स्थिति कींव करण्यासारखी झाली आहे. या दोहोंतून कोणाच्या तरी एका बाजूला मिळाल्याशिवाय बल्गेरियाला दुसरा मार्ग मोकळा नाहीं आणि जर्मनीला उघड मिळावें कां रशियाची मर्जी राखावी हें टरविणें लेनिनग्राड व ओडेसा येथील जर्मनीच्या जयापजयावर अवलंबून आहे. जर्मनीनें लेनिनग्राड घेऊन जर मास्कोवर रोख धरला, मध्यंतरींचें स्मॉले- न्स्कच्या पूर्वेचें रशियन सैन्य घेरण्याचा डाव टाकला आणि दक्षिणेकडे ओडेसा बंदर घेऊन तिकडील रशियन सैन्याह कोंडीत धरलें तर बल्गेरिया उघडपणें जर्म- नीला आरमारी मदत देईल आणि काळ्या समुद्रांत दर्यावरील लढाई होऊन कॉकेशस प्रांताला धोका उत्पन्न होईल. परंतु जर्मनीचें हे सगळें मनोराज्य सिद्धीस जाणें संभवनीय नसल्यानें बल्गेरिया शक्य तोंवर टाळाटाळ करील आणि त्यामुळे कॉकेशसवरील स्वारी लांबणीवर पडेल असे वाटते. आज बल्गेरियाची जी अवस्था तीच पुढेमागें तुर्कस्तानची होण्याचा संभव आहे. काळ्या समुद्रांत दर्यायुद्ध होऊन जर्मनी जर कॉकेशस प्रांतावर चालून जाईल तर यापुढे तुर्कस्तानला तटस्थ राहणें अशक्य होऊन जाईल. अर्थातच तुर्कस्ता- नचा तटस्थपणा टिकणें अथवा दोस्त राष्ट्रांना येऊन मिळणें हें ब्रिटिश व रशियन सैन्याच्या इराणमधील हालचालींवर अवलंबून आहे. इराणचा प्रदेश या दोन्ही राष्ट्रांनी सध्यां आपल्या मुठींत घेतला आहे. पण तेथून पुढील हालचाली कोणत्या दिशेनें होतील याचा सुगावा अद्यापि लागत नाहीं. आणि तो सुगावा लागल्याशिवाय कॉकेशसच्या आसपास होणाऱ्या सैनिक हालचालींची कल्पना करतां येत नाही. उत्तर-आफ्रिकेंत तयारी कॉकेशस प्रांतांत जर्मनीशी गांठ घालण्यापेक्षां उत्तर आफ्रिकेंतच जर्मनीला गांठून त्याच्या हालचालींना पायबंद बसवावा हें अधिक सयुक्तिक दिसतें व त्या दृष्टीनें ब्रिटिशांची उत्तर-आफ्रिकेंत तयारी चालू असल्याची वार्ता येत आहे. उलट- पक्षीं जर्मनीलाहि हीच भीति वाटत असल्यामुळे सध्यां जर्मनीनें भूमध्य समुद्रांतून आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावर सैनिक आणि साहित्य उतरविण्याचा सपाटा चाल- विला आहे. भूमध्य समुद्रांतून प्रवास करतांना जर्मनीच्या अनेक बोटी ब्रिटिशांकडून बुडविल्या जात आहेत; तरी पण आपल्या सैन्याच्या व नौकांच्या हानीची पर्वा न करतां जर्मनीनें आपला क्रम चालविलाच आहे. त्यावरून लेनिनग्राड व ओडेसा येथील युद्धवार्तेनंतर उत्तर आफ्रिकेतील रणधुमाळीची वार्ता येण्याला सुरुवात होईल असें दिसतें.