पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध मध्यंतरींच्या स्मॉलेन्स्कसमोरील आघाडीवर जर्मनांनी आपली मोहीम स्थगित केल्यासारखीच दिसते. येथें रशियनांकडून उलट हल्ले होऊं लागले आहेत आणि त्या भागांतील कांहीं गांव रशियनांनी परत जिंकून घेतली असेंहि प्रसिद्ध झाले आहे. परंतु या आघाडीवरील झटापटीला तादृश महत्त्व नाहीं. लेनिनग्राड जिंकून उत्तरेकडचें जर्मन सैन्य जर मास्कोच्या रोखानें दक्षिणेकडे चालून येऊं लागले आणि पोल्टाव्हा येथील जर्मनांची आघाडी खारकोव्ह घेऊन तेथून जर मॉस्कोच्या रोखानें उत्तरेकडे वळली तर स्मॉलेन्स्कच्या समोर असलेले हे रशियन सैन्य आपोआपच मागें पूर्वेकडे हटेल आणि तें तसें न हटेल तर कोंडीत सांपडेल, याकरितां स्मॉलेन्स्कसमोरील रणभूमीचा स्वतंत्र विचार कर्तव्य नाहीं. २८ युक्रेनची राजधानी पडली कित्येक दिवसपर्यंत कीव्हला वेढा घालून अखेरीस जर्मनीने युक्रेनची कीव्ह ही महत्त्वाची राजधानी जिंकून घेतली. रशियन अधिकाऱ्यांनी आतां आपण कीव्ह शहर सोडून दिले, असें स्वतःच कबूल केले आहे. पण की व्हमधील किती रशियन सैन्य कोणत्या दिशेनें कोठपर्यंत मागे हटले याचा अद्यापि उलगडा झाला नाहीं. कीव्हमधून मागें परतणाऱ्या रशियन सैन्याला घेरण्यासाठी तर जर्मनीने पोल्टाव्हा घेऊन खारकोव्हकडे मोर्चा वळविला आहे. आणि याच हेतूनें उत्तरेकडचें चर्नि गोव्ह येथील सैन्य नैजिनच्या रोखानें खाली येत आहे, तेव्हां या मार्गातील युद्धाचा पुढील रागरंग दोन्ही पक्षांच्या सैन्यांच्या हालचाली किती जलद होतील त्यावरच अवलंबून आहे. अगदी दक्षिणेकडील जर्मन पथकांनी अद्यापि ओडेसा बंदर हस्तगत केलें नाहीं. तं बंदर हस्तगत झाल्यानें क्रिमियाकडचा मार्ग निर्वेध होणार आहे. तथापि ओडेसा बंदर न घेतां देखील त्यापुढील खरसन बंदर घेऊन आणि मुखाजवळच नीपर नदी ओलांडून जर्मनीनें पेरिकोपपर्यंत मजल गांठली आहे. पेरिकोप येथील संयोग- भूमीनें क्रिमियाचें द्वीपकल्प युक्रेनला जाडलेले आहे. यामुळे ही संयोगभूमि जर्म- नांच्या हातीं जाईल तर क्रिमियाचा उत्तरेकडचा संबंध तुटेल आणि जर्मनांना अझोव्ह समुद्राच्या उत्तर किनाऱ्याानें कॉकेशस प्रांताकडे जाण्याचा रस्ता मोकळा होईल. या बाजूला रशियनांचें फारसें सैन्य नसले तरी कॉकेशस प्रान्ताच्या पश्चिम सरहद्दीवर रशियाची जय्यत तयारी आहे आणि पेरिकोपपासून कॉकेशसच्या या पश्चिम सरहद्दीचें अंतर सुमारे २७५ मैल आहे. यावरून जर्मन सैन्याला या बाजूने आतांच कॉकेशस प्रांत गाठतां येईल असे वाटत नाहीं. बल्गेरिया व तुर्कस्तान पण कॉकेशस प्रांतावर चढाई करण्याला काळ्या समुद्रांतूनहि मार्ग आहे. त्या मार्गानें दर्यावरून स्वारी करावयाची म्हटल्यास आरमाराची तयारी मोठीच