पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रशियांतील रणसंग्रामाचा आढावां . २७ ६५००००० चौरस मैल आहे. त्यांतला अवघा शेंकडा ७ टक्के मुलूखच जर्मनीनें जिंकला असल्याचे दिसून येतें. रशियाच्या विस्ताराच्या मानाने जिंकलेला मुलूख अगदी थोडा आहे; आणि त्यामुळे रशियाला एवढा मुलूख गेल्यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने कांही फारशी अडचण भासणार नाहीं. जिंकलेल्या मुलुखाचें महत्त्व तथापि जर्मनीने जिंकलेला हा मुलूख सर्वच दृष्टींनी अतिशय महत्त्वाचा आहे. रशियाच्या खनिज द्रव्यांपैकी ६० टक्के लोखंड, ३५ टके मँगॅनीज, ४४ टक्के अॅल्यू- मिनियम् या प्रांतांतूनच काढले जात असते. तसेंच युक्रेन प्रांत हा सुपीकपणा- विषयींहि नांवाजलेला असून एवढा धान्य पिकविणारा मुलूख हातचा जाणें म्हणजे रशियाचे मोठेच नुकसान होय. याशिवाय उत्तरेस लेनिनग्राडपासून तो दक्षिणेस आझोफच्या समुद्रापर्यंत जो प्रदेश आहे त्यांत अनेक कारखान्यांची केंद्रे आहेत. ती रशियाच्या हातून जाऊन जर्मनीच्या हातांत पडल्याने रशियाचें दुहेरी नुकसान झाले आहे. कारण हे कारखाने हातचे गेल्यानें रशियाला रणसामुग्रीचा तेथून पुरवठा होण्याचें बंद पडून जर्मनीला कालांतराने तरी त्यांचा उपयोग होण्यासारखा आहे. 'लेनिनग्राड घ्या ' या दृष्टीने पाहिल्यास जर्मनीने आतांपर्यंत आपले लाखो सैनिक या युद्धांत बळी दिले असले तरी त्या बलिदानाच्या जोरावर जो मुलूख जर्मनीने आक्रमिला त्या योगानें जर्मनीला हे युद्ध पुढे चालविण्याला मोठी मदत होणार आहे. आतां रशियांतील हिवाळा लवकरच सुरू होईल आणि त्या वेळी युद्ध चालविणे अडचणीचें होईल. त्याकरितां जर्मनीने आगाऊ तजवीज चालविली आहे असे दिसतें. हिवाळ्याची छाया पडण्याच्या आंत लेनिनग्राड शहर हस्तगत करण्यासाठी जर्मनांची जिवापाड धडपड चालली आहे. खुद्द लेनिनग्राडच्या परिसरांतच निकराची झुंज चालू असून त्यांत उभय पक्ष अगदी अटीतटीने लढत आहेत. लेनिनग्राड हातचें गेल्यास त्यांत रशियाची लौकिकदृष्टया नामुष्की होऊन शिवाय एवढे मोठे औद्योगिक कारखान्यांचें केंद्र हातचें गेल्यानें त्याची मोठी हानि होणार आहे. शिवाय लेनिनग्राड गेलें कीं बाल्टिक समुद्रावरचा ताबा गेल्यासारखाच आहे. याकरितां रशियन सेनापति कितीहि प्राणहानि झाली तरी या शहराचा ताबा सोडण्यास कबूल होणे संभवनीय दिसत नाही. उलटपक्षी जर्मनांना जर लेनिनग्राड जिंकता आले नाही तर त्यांची रशियांतील प्रगति येथेंच खुंटेल. लेनिनग्राड जिंकल्याखेरीज मास्कोला खरा शह बसणे शक्य नाही आणि हिवाळ्यांत ही आघाडी सांभाळणेंद्दि जर्मनीला शक्य होणार नाहीं. यास्तव 'कांहींहि करा पण लेनिनग्राड घ्या' असा जर्मन सर्वाधिकाऱ्यांचा सक्तीचा हुकूम आहे आणि यामुळेच उभय पक्षांत येथें भयंकर रणकंदन माजून राहिले आहे.