पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध सैन्य परराष्ट्रावर चालून गेलेले असून फिन्लंडचे वीर मायभूमीच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावून लढत होते. हल्ला करणाऱ्या सैन्याचा आवेश व त्याची चिकाटी आणि आत्मसंरक्षण करीत असलेल्या सैन्याचा आवेश व चिकाटी यांच्यांत स्वभावतःच महदंतर पडतें याची टीकाकारांस कल्पनाच नसावी असे दिसतें. अर्थातच ज्यांना आक्रमक युद्ध व संरक्षक युद्ध या दोहोंत सैनिकांकडून दाखविल्या जाणाऱ्या शौर्यातील नैसर्गिक फरक लक्षांत येतो त्यांनी आरंभापासूनच असली चुकीची अनुमानें काढली नव्हती. रशियांतले युद्ध हें कांहीं डेन्मार्क, हॉलंड, बेल्जम व फ्रान्स या देशांतल्या युद्धा सारखें विद्युत्वेगानें संपणारें युद्ध नव्हे, याकरितां जर्मनीला निराळेच डावपेंच योजावे लागतील; आणि हिवाळा सुरू होतांच खंदकांचा आश्रय करावा लागेल, असें आम्ही पूर्वीच लिहिले होतें; आणि एवढी साधी उघड दिसणारी गोष्ट जर्मन लष्करी तज्ज्ञांच्या लक्षांत आली नसेल अशी टीकाकारांनी स्वतःची समजूत करून घेण्यांत स्वतःचेंच अज्ञान प्रकट होतें हैं उघड आहे. जर्मनीने काय साधलें या आक्रमक युद्धांत किती दिवसांत आणि किती सैनिक बळी देऊन आपण युक्रेन प्रांत हस्तगत करूं याविषयीं जर्मन सेनाध्यक्षांच्या मनांतले बेत इतरांना समजणे शक्य नाहीं; आणि रणांगणावर कोणत्या पक्षाची किती हानि झाली याचे नक्की आंकडेहि बाहेरच्या लोकांना युद्ध समाप्त होईपर्यंत कळणार नाहीत. यास्तव या दोन्ही अनिश्चित गोष्टीसंबंधानें उलटसुलट चर्चा करण्यांत कालक्षेप न करतां ज्या गोष्टी निर्विवाद सिद्ध होण्यासारख्या आहेत तेवढ्यांचाच आढावा घेऊन तीन महिन्यांच्या युद्धांत जर्मनीनें रशियांत काय साधलें तें पाहूं. बातमी देतांना कितीहि लपवाछपवी केली तरी नकाशांत कांहीं तसली लपवाछपवी होऊं शकत नाही. याकरितां रशियाचा प्रत्यक्ष नकाशाच उघडून पाहिला असतां तीन महिन्यांत जर्मनीनें केवढा प्रदेश पादाक्रान्त केला तें दिसून येतें. ईस्ट प्रशिया- पासून लेनिनग्राडचें अंतर ४५० मैल आहे. ईस्ट प्रशियापासून रमॉलेन्स्क ३७५ मैलांवर आहे. झेकोस्लोव्हाकियाच्या सरहद्दीपासून कीव्ह ३०० मैल असून तेथून पोल्टाव्हा २०० मैल आहे. पोल्टाव्हापासून ज्या खार्केव्हिकडे जर्मनांचा रोख आहे तें खाव्ह ७० मैल आहे. अगदी दक्षिणेस बेसअरेबियापासून खरसन बंदर ३०० मैल आहे आणि तेथून पेरिकोव्ह ७५ मैलांवर आहे. अशा प्रकारें कमीत कमी ३०० मैलांपासून तो जास्तीत जास्त ५०० मैलपर्यंत जर्मन सैन्य रशियांत घुसलें आहे. याच प्रदेशाची लांबी कमीत कमी १५०० मैल आहे. यावरून अगदी किमान पक्ष ४५०००० चौरस मैलांचा प्रदेश जर्मनांनी आपल्या कबजांत घेतला आहे हें दिसून येईल. युरोपांतील रशियाचें अकंदर क्षेत्रफळ पाहिल्यास ते सुमारें