पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रशियांतील रणसंग्रामाचा आढावा २५ वाहत होते आणि सगळ्या रणक्षेत्रभर प्रेतांचा खच पडला होता असें कविवर्णन आहे. हे काव्यमय वर्णन अतिशयोक्तीचें आहे असे आपण समजतों. पण आज राशि- यांतील २ हजार मैल पसरलेल्या रणक्षेत्राकडे दृष्टि फेकल्यास महाभारतांतील अति- शयोक्तिपूर्ण वाटणाऱ्या देखाव्याहूनहि जास्त भयानक देखावा तेथें दिसून येईल. जर्मनीनें रशियावर चाल करून प्रत्यक्ष खणाखणीस सुरुवात केल्याला आज तीन महिने झाले. या तीन महिन्यांत फारच थोडे दिवस प्रत्यक्ष युद्धाला खळ पडला असेल. मध्यंतरींचे विश्रांतीचे व नव्या व्यूहरचनेचे कांहीं थोडे दिवस वगळल्यास, बाकीचे सर्व दिवस आकाशांतून अभिगोळ्यांचा वर्षाव, रणभूमीवरून रणगाड्यांची मुसंडी आणि चौफेर यांत्रिक तोफांतून केला जाणारा मारा यांच्या योगानें भयंकर सैनिकसंहार एकसारखा चालू आहे. यांत परस्परांनी परस्परांच्या रणसामुग्रीचा आणि सैनिकांचा किती संहार केला, यासंबंधीचे आंकडे अतिशयो- क्तीचे असले, तरी त्यावरून या संग्रामाचें भीषण स्वरूप कळून आल्याशिवाय राहत नाहीं. जर्मनीनें प्रसिद्ध केलेले आंकडे पाहिल्यास त्यांत रशियनांची हानि २५ लाखां- वर झाली असून जर्मनांची ४ लक्षपावेतों झाली आहे असे सांगण्यांत येतें. रशिया- कडून प्रसिद्ध होणारे आंकडे लक्षांत घेतल्यास ते अर्थातच याच्या उलट आहेत. तरी पण त्यावरून उभयपक्षांची मिळून ३० लक्षांपर्यंत हानि झाली असावी, एवढी गोष्ट निर्विवाद ठरते; मग त्यांत कोणाचा वांटा कितीहि कमजास्त असो. मायभूमीचा निकराचा बचाव ग २६०/४३४० एवढी काल्पनातीत सैनिकांची संख्या रणदेवतेला बळी देऊन उभय पक्षांनी काय साधलें हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या युद्धांत आरंभापासूनच आपला बचाव करणे भाग पडल्यामुळे आपण आपल्या मायदेशाचा बचाव किती निकराने करीत आहों एवढेच रशियाला दाखवितां येण्यासारखे आहे. आणि त्या बाबतींत रशियानें प्रतिपक्षाकडूनहि शाबासकी मिळविली आहे. या महायुद्धाच्या पहिल्या काळांत रशियानें फिन्लंडवर जी स्वारी केली, त्या स्वारींत रशियाला जसें मिळावें व जितक्या लवकर मिळावें तितकें लवकर यश मिळाले नाही. त्यावरून कित्येकांनी जर्मनीच्या वावटळीपुढे रशियन सैन्याची थोड्याच दिवसांत वाताहात होईल असा तर्क करून ठेवला होता; आणि आतां तितक्या अल्पावधीत जर्मनी रशियाला चीत करूं शकला नाही, यावरून जर्मनीच्या सामर्थ्याला उतरती कळा लागल्याचें अनुमान कित्येक करीत आहेत. पण यांतले पहिले अनुमान चुकीचें असल्यानें दुसरें अनुमान आपोआपच लंगडे पडतें. फिन्लंडच्या युद्धांत रशियाला हातोहात जय मिळाला नाहीं याला अनेक कारणे होती. त्यांतले मुख्य कारण हें की, त्या वेळी रशियाची लढण्याची तयारी पूर्ण झालेली नव्हती, रशियाला त्या वेळी इंग्लंड किंवा अमेरिका यांच्याकडून कोणतीहि मदत होत नव्हती आणि मुख्य कारण असें कीं, रशियन