पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध इंग्लंडचा दृढनिश्चय इंग्लंडच्या परवानगीनें असो अथवा परवानगीशिवाय असो, फ्रान्सने जर्मनी व इटाली या दोन्ही देशांशी त्यांच्या अतिकडक अटी स्वीकारून तह केला; तेव्हां आतां पुढे काय करावयाचें, हा प्रश्न इंग्लंडपुढे शिल्लक राहतोच. याचें उत्तर चर्चिलसाहेब आपल्या पार्लमेंटपुढील भाषणांत देऊं शकले नाहींत. या वेळीं तें उत्तर देतां येणें शक्यहि नाही, यास्तव चर्चिल यांनी पार्लमेंटला एवढेच आश्वा- सन दिलें कीं, पार्लमेंटला कळविल्याशिवाय आणि देशांतील लोकमत काय आहे याचा ठाव घेतल्याशिवाय ब्रिटिश मंत्रिमंडळ कोणतीहि गोष्ट करणार नाही. त्यावर अशी शंका निघाली कीं, फ्रान्समध्ये युद्धाचें संकट आल्यामुळे जशी पार्लमेंट भरूं शकली नाहीं, व फ्रेंच वृत्तपत्राहि प्रसिद्ध होऊं शकली नाहींत, तशी वेळ आल्यास चर्चिल काय करणार? याला उत्तर म्हणून चर्चिल यांनी ठासून सांगितले की, इंग्लंडांतील वृत्तपत्रे बंद न पडतील आणि पार्लमेंटची बैठक हमखास भरेल, अशीच तजवीज आपण खात्री करूं. या उत्तरांत इंग्लंडचा दमदारमणा व दृढ- निश्चय स्पष्टपणे दिसून येतो. अशा दृढनिश्चयानें इंग्लंड यापुढे युद्ध चालविणार आहे. पण तें कोठें कसें चालविणार याचा खुलासा आतांच करणे शक्य नाहीं व श्रेयस्करहि नाही, असे सांगून चर्चिल यांनी त्याचें उत्तर दिनावधीवर टाकले. याच कारणास्तव आम्हांलाहि याची मीमांसा पुढे टाकणे भाग आहे. २४ रशियांतील रणसंग्रामाचा आढावा [ जर्मनीने १९४१ च्या जून महिन्यांत रशियाविरुद्ध युद्ध पुकारले आणि तीन महिन्यांत सुमारे तीनशें मैलपर्यंत प्रगति केली. एवढ्या झपाट्याच्या आक्र- मणानंतर आपाआपली बाजू स्थिरस्थावर करण्याकरितां दोन्ही बाजूंकडून युद्ध मंदावल्या वेळी मागील तीन महिन्यांचा युद्धाचा आढावा घेऊन भावी हालचाली कशा घडतील याविषयींचे कांहीं अंदाज या लेखांत व्यक्त केले आहेत. त्यांत यापुढें उत्तर-आफ्रिकेंत शस्त्रांचा खणखणाट सुरू होईल असे केलेले अनुमान त्यानंतर लवकरच प्रत्ययास आलें.] महाभारतांत वर्णिलेला भयंकर रणसंग्राम १८ दिवस चालला होता व त्यांत अवघें १८ अक्षौहिणी सैन्यच लढत होतें. तरी देखील रणभूमीवरून रक्ताचे पाट (केसरी, दि. २३ सप्टेंबर १९४१ )