पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्रान्सच्या शरणागतीची मीमांसा २३ परभारें बोलणें न करतां फ्रान्सने इंग्लंडची अनुज्ञा मागितली, यावरून फ्रेंचांचा निरुपाय झाल्यामुळे अशी मागणी करावी लागली हैं उघड दिसतें. बरें, फ्रेंचांनी वेगळा तह करण्याची इच्छा दर्शविल्यावर ब्रिटिश मंत्रिमंडळानें तरी फ्रान्सला उत्तर काय दिलें ? फ्रान्सपुढे दोन योजना ठेवण्यांत आल्या. फ्रान्स व इंग्लंड यांचा कारभार संयुक्त पद्धतीने चालावा, अशी एक योजना होती. ती अमलांत आली असती तर फ्रान्सचें स्वतंत्र अस्तित्व कितपत टिकलें असतें, हा एक प्रश्नच आहे. त्या योगानें राष्ट्राचें स्वतंत्र अस्तित्व नाहीसें होतें असें फ्रेंचांना वाटले म्हणून तसली योजना त्यांनी नाकारली, आणि फ्रेंच प्रधान जर्मनीच्या गळ्यांत पडले, याला अदूरदर्शी- पणा म्हणून नांवें ठेवतां येतील पण तेवढ्यानें विश्वासघाताचा आरोप फ्रान्सविरुद्ध शाबीत करता येणार नाहीं. इंग्लंडची सूचना अव्यवहार्य होती विन्स्टन चार्चल यांनी आपल्या भाषणांत उघड केलेली दुसरी योजना याच्याहिपेक्षां विचित्र होती. फ्रान्सने आपले सगळें आरमार ब्रिटिशांच्या स्वाधीन करावे आणि नंतर मग चाललेले युद्ध तहकूब करण्यासंबंधानें जर्मनीशी वाटाघाट करावी. ही अट फ्रान्सनें मान्य केली असती म्हणजे मग फ्रान्सवर विश्वासघाताचा आरोप केला गेला नसता, असें चर्चिलचें मत दिसतें. पण फ्रान्सला सुचविलेली ही अट शक्य कशी आहे, याचा खुलासा चर्चिल यांनी आपल्या भाषणांत केला नाही. इंग्लंडनें सुचविलेली ही अट जर्मनीने कबूल केलीच पाहिजे असें त्याजवर बंधन कोण घालूं शकणार होतें ? फ्रान्स वाटेल त्या अटी सुचवील, परंतु शरण आलेल्या राष्ट्राच्या कोणत्या अटी मान्य करावयाच्या व कोणत्या झिडकारावयाच्या, हे सर्वस्वी जेत्यांच्या मर्जीवरच अवलंबून राहते. त्यामुळे जर्मनीकडून जर युद्धतहकुबी पाहिजे असेल तर जर्मनीचा ज्या अटीला हटकून विरोध होईल, अशी अट सुचविण्यांत तरी काय स्वारस्य राहिलें असतें ! फ्रान्सनें इंग्लंडच्या सूचनेप्रमाणे आपले आरमार ब्रिटिश बंदरांत पाठविण्याचें मनांत योजून नंतर तहाची वाटाघाट सुरू केली असती, तर जर्मनीने साफ सांगितलें असतें कीं, आधी तुमचें आरमार आमच्या स्वाधीन करा, म्हणजे मग तहाची भाषा बोलं. असा जबाब आला असतां तर फ्रान्सला दुसरा कोणता मार्ग राहिला होता ? एवंच इंग्लंडनें फ्रान्सला सुचविलेली ही अट त्यांच्या दृष्टीनें इंग्लं- डला कितीहि फायदेशीर असली तरी फ्रान्स जर अगदी हातटेकीला आल्यामुळेच तह करण्याला उतावीळ झाला होता, तर अशा वेळी जी अट जर्मनी कबुल कर- णार नाही, अशी अट घालून फ्रान्सला शरण जाण्याला परवानगी देण्यांत शहाण- पणा कोणता ? सशर्त का होईना पण इंग्लंडनें फ्रान्सला शरणचिठ्ठी लिहून देण्याची परवानगी दिली. त्यांतील शर्त अव्यवहार्य दिसल्यानें ती न पाळतां फ्रान्सनें तह केला, हा विश्वासघात कसा मानावयाचा !