पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध घेण्याची चटक मजुरांना लागली; त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचा दास होत चालला व मालाचें उत्पादन कमी होत चाललें. अशी जी फ्रान्समध्यें बजबजपुरी माजत चालली तिचा समाजावर वाईट परिणाम होत आहे त्याचेंहि वर्णन ता. १७ मार्च १९३९ च्या अंकांत आलेच आहे. वरील सर्व ऊहापोहाचा निष्कर्ष हाच कीं, फ्रेंच राष्ट्राला युद्धाच्या वेळीं सैनिकांची व शस्त्रास्त्रांची जी उणीव भासली व जिच्यामुळे शरणागतीचा प्रसंग आला ती आपत्ति आकस्मिक उद्भवलेली नसून गेल्या वीस-बावीस वर्षांत जी विचार- सरणी व जी चैनीची राहणी फ्रान्स वगैरे देशांत प्रसृत करण्यांत आली तिचाच हा परिणाम होय. फ्रेंचांची शरणागति इंग्लंडला जाचेल असो. येथवर फ्रान्सच्या शरणागतीच्या कारणांची मीमांसा झाली. आतां या शरणागतीच्या परिणामाचीहि थोडीशी मीमांसा करणे प्राप्त आहे. फ्रान्सने हातचें शस्त्र खाली टाकल्याबरोबर इंग्लंडची एक बाजू लंगडी पडून महायुद्धाचा सगळा बोजा एकट्या इंग्लंडवर पडला आहे. फ्रान्स शरण जाण्यापूर्वी अमेरिकेची भरपूर मदत दोस्त राष्ट्रांना होण्याचा संभव दिसत होता. परंतु अलीकडे अमेरिकेच्या वृत्तींत चल- बिचल दिसूं लागली आहे. अशीच चलबिचल इजित व बाल्कन राष्ट्र यांच्यांतहि दृष्टोत्पत्तीस येत आहे. त्यांतून फ्रान्स व इटाली यांच्यांत जो तात्पुरता संधि झाला . आहे त्यांतील अटी पाहिल्या असतां त्या ब्रिटिशांना आफ्रिकेतील युद्ध चालवि- ण्याला पुष्कळच नडण्यासारख्या दिसतात. इटालीने फ्रेंचांचे सोमालीलँडमवलें जें जिवूटी बंदर आपल्याकडे घेण्याचे ठरविले आहे, त्यामुळे तांबडा समुद्र, एडनचें आखात व अरबी समुद्र यांच्यांतील आरमारी हालचालींवर इटालीला झडप घालतां येईल. एडनपासून जिबूटीचें अंतर अवघें ८० मैल आहे. या व अशाच इतर अनेक कारणांमुळे फ्रेंचांची ही शरणागति इंग्लंडला अतिशय जाचक होणार आहे. त्यामुळे ब्रिटिश राष्ट्र फ्रान्सवर विश्वासघाताचा आरोप करूं लागले आहे. परंतु ता. १५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटांत चर्चिलचें फ्रान्स- च्या शरणागतीसंबंधाचें जें विस्तृत भाषण झाले, त्यावरून फ्रान्सवर विश्वास- घाताचा आरोप सिद्ध होतो असें दिसत नाहीं. चर्चिल यानें आपल्या भाषणांत स्वतःच सांगितले आहे की, पेताँ हे अधिकारारूढ होण्यापूर्वी ता. १३ जूनपासून रेनॉ यांनीच आम्हांला वेगळा तह करण्याची परवानगी द्या अशी मागणी सुरू केली होती. अर्थातच फ्रान्सची स्थिति अत्यंत हलाखीची झाल्यामुळे त्याचा टिकाव लागणें शक्य नाही आणि इंग्लंड जर युद्ध बंद करीत नसेल तर फ्रान्सला तरी त्यानें त्याच्या वचनांतून मुक्त करावे असा फ्रेंचांचा आग्रह होता. विश्वासघातच करावयाचा असतां तर इंग्लंडला न विचारतांच परभारें फ्रान्सनें जर्मनीशी बोलणे सुरू केले असते. तसे