पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्रान्सच्या शरणागतीची मीमांसा २१ मागील खेपेपेक्षां ५ लक्षांनी कमी होतें. मागील युद्धांत इतर राष्ट्रांची मदत भरपूर मिळाली होती. त्या वेळी ब्रिटिशांच्याकडून १५ लक्ष सैनिक युद्धार्थ सज्ज झाले होते, तर यावेळी अवघे २ लक्षच इंग्रज-फ्रेंच रणभूमीवर उभे ठाकले. अमेरिकेचे ८ ते १० लक्ष शिपाई फ्रान्सच्या मदतीला त्या वेळी आलेले होते. या वेळी अमेरिका अद्यापि युद्धांत पडली नाही म्हणून ते आंकडे हिशेबांत धरण्याची गरज नाहीं हें खरें; तरी पण ज्या सुखलालसेच्या वृत्तीमुळे, इंग्लंड व फ्रान्स यांतील सैनिकांचा भरणा या वेळी कमी झाला तेंच कारण अमेरिकेलाहि प्रसंग आलाच तर लागू पडणार नाही असे नाही. देशाभिमानासाठी, ध्येयासाठी आणि तत्त्वासाठी वैयक्तिक सुखावर लाथ मारून राष्ट्रांतील पुढारी सांगतील ते कष्ट करण्याला आणि प्रसंग पडेल तसा स्वार्थत्याग करण्याला ज्या देशांतील तरुण तयार असतात तेथें अशी आपत्ति कोसळत नाहीं. लढाईसारखा प्रसंग येईल त्या वेळी आपण बलिदानास सिद्ध होऊं; पण तसे संकट आले नसतां उगाच वर्षानुवर्ष सुखासुखी हडेलहप्पी करून त्रास कां सोसावा अशी विचारसरणी मनांत आणून चैनीच्या राहणीचें समर्थन केले जातें; परंतु सुखाची चटक एकदां लागली म्हणजे संकटाच्या वेळी एकाएकी मनोवृत्ति बदलू शकत नाही, असा हा मनुष्यस्वभावच आहे; याकरितां समाजांतील घटकांना भर- भराटीच्या काळांतहि आपत्तीच्या काळांतल्याप्रमाणेच सुखावर पाणी सोडण्याची संवय लावून ठेवली पाहिजे. मजुरांचे लाड पुरविल्याचा परिणाम आमची शस्त्रास्त्रे अपुरी पडली, जर्मनीच्या सहा विमानांबरोबर फ्रान्सच्या एकेका विमानाला लढावें लागलें अशी जी केविलवाणी कबुली मार्शल पेता यांनी या वेळी दिली तिच्यावरूनहि हें सामान्य तत्त्वच सिद्ध होतें. महायुद्ध उपस्थित होण्याच्या आधी फ्रान्समधील कारखान्यांतून मजुरांकडून कामाची टाळाटाळच चालत असे. मजुरांच्या कामाचे तास कमी करतां करतां आठवड्यांत अवघे ४० तास काम घेण्यांत येऊ लागले. याचा दुष्परिणाम कसा भोवेल याचें भविष्य ता. २७ सप्टेंबर १९.३८ च्या केसरीतील लेखांत पुढीलप्रमाणे वर्तविलें होतें. "मॉ. ब्लम यांच्या ४० तासांच्या आठवड्यामुळे फ्रान्सचें लष्करी यंत्र पूर्णपणे पंगू झाले आहे. त्यामुळे जर्मनीत एका महिन्यांत जितकी विमानें तयार होतात तितकी विमानें फ्रान्समध्ये सबंध वर्षात देखील तयार झाली नाहींत. विमानांची जी कहाणी तीच कहाणी आरमारी जहाजांचीहि आहे. " या उताऱ्यावरून वाचकांच्या लक्षांत येईल की, मार्शल पेता यांनी शस्त्रास्त्रांच्या तुटवड्याचें जें गान्हाणें आतां गाइले त्याचें बीज बरेंच पूर्वीपासून पेरलें गेलें होतें. फ्रान्स देशांत कम्यूनिझमचा जो प्रचार अनिर्बंधितपणें केला गेला तोच अशा रीतीनें फळास आला. अधिक काम करून अधिक पगार मिळविण्याची हांबू वरण्यापेक्षां संप करून पगार वाढवून 1