पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध आहे कीं, अशी परिस्थिति कशामुळे आली ! लोकसंख्या इतकी कां घटली, चैनीची इतकी चटक कां लागली, शस्त्रास्त्रांचा व इतर रणसाहित्याचा पुरवठा इतका कमी कां पडला, पूर्वीच्या युद्धांतले फ्रान्सचे कांहीं दोस्त यावेळी तटस्थ कां राहिले अथवा उलट फ्रान्सच्या जिवावरच कां उलटले इत्यादि प्रश्नांची साधक-बाधक चर्चा होणें समाजहितदृष्ट्या आवश्यक आहे. दोस्तांची संख्या कां घटली हा जो या प्रश्न- मालिकेतला शेवटचा प्रश्न आहे तो केवळ राजकीय स्वरूपाचा असून फारच गुंतागुंतीचा आहे, यास्तव त्याची चर्चा तूर्त बाजूस ठेवून पहिल्या तीन प्रश्नांचाच ऊहापोह करूं. २० घोडा कां अडला, पाने कां कुजली, भाकरी कां करपली या तीनहि प्रश्नांचें ‘न फिरविल्यामुळे' हे जसे एकच उत्तर देतां येतें, तसेंच वरील तीनहि प्रश्नांचे एकच उत्तर देतां येईल व तें उत्तर हेंच की, त्यागापेक्षां भोगाकडे, कर्तव्यापेक्षां हक्काकडे आणि समाजहितापेक्षां वैयक्तिक स्वातंत्र्याकडे लक्ष लागल्याचा हा दुष्परिणाम आहे. युद्धांत एखाद्या राष्ट्राचा पराजय झाला, कुस्तींत एखादा पहेलवान हरला, किंवा परीक्षेत एखादा विद्यार्थी नापास झाला म्हणजे मागाहून त्या पराजयाची मीमांसा करणे सोपें असतें व तशी मीमांसा कर ण्यास जो तो अहमहमिकेनें पुढे येतो. पण आमची ही मीमांसा पश्चात् बुद्धीच्या स्वरूपाची नाही. गेल्या एकदोन वर्षात केसरींत परराष्ट्रीय राजकारणावर जे अनेक लेख प्रकाशित झाले व जे लेख 'लढाऊ राजकारण' या पुस्तकांत एकत्र प्रथित झाले आहेत त्या लेखांतून त्या वेळींच या प्रश्नांचा ऊहापोह झाला आहे. ता. १४ ऑक्टोबर १९३८ च्या 'जर्मनीचा अभूतपूर्व विजय' या लेखांत जर्मनींतील लोक- संख्येची वाढ आणि फ्रान्स व इंग्लंड यांतील लोकसंख्येची घट होत चालल्यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांचे महत्त्व युरोपांत कसें कमी होत चालले आहे याचें दिग्दर्शन केलें होतें. मार्शल पेताँ म्हणतात त्याप्रमाणें त्याग आणि कष्ट करणे याची संवय सुटून सुखोपभोगाची लालसा वाढत चालली आणि चैनीची चटक लागली कीं, समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होऊन कृत्रिम संततिनियमना- सारखी खुळे बोकाळतात आणि मग शत्रूशी लढण्याचा प्रसंग आल्यावर संतति कमी म्हणून लष्करांत भरती कमी, आणि सैनिकांची संख्या कमी म्हणून राष्ट्राचें रक्षण करण्याची शक्ति कमी, अशी आपत्तीची परंपरा ओढवते; आणि शत्रूला शरण जाण्याची पाळी येते. पूर्वीच्या महायुद्धांतल्यापेक्षां चालू महायुद्धांत फ्रान्समध्ये लढणाऱ्या शिपायांची संख्या किती कमी होती याचें आंकडे मार्शल पेताँ यांनींच जाहीर केले आहेत. पूर्वीच्या महायुद्धांत तीन वर्षे भयंकर मनुष्यसंहार झाल्यानंतर देखील फ्रान्समध्ये ३२ लक्ष ८० हजार सैनिक खडे होते. चालू महायुद्धांत युद्धारंभींच फ्रान्सचें लष्कर