पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्रान्सच्या शरणागतीची मीमांसा १९ तोपर्यंत इटाली इतर भागांत कसाबसा टिकून राहिला, तर मागाहून इटालीला साहाय्य करण्याला जर्मनी मोकळा होईल आणि मग इटालीला आज जो पेंच पड- लेला दिसत आहे, त्या पेंचांतून इटाली सुटून, उलट दोस्तांवरच पुनश्च अमेरिका, बाल्कन राष्ट्रे किंवा रशिया यांची मनधरणी करण्याचा प्रसंग येईल. अशा रीतीनें फांसा उलट पडणे किंवा सुलट पडणे हें फ्रान्समधील लढाईच्या परिणामावर व कालावधीवर अवलंबून आहे. फ्रान्सच्या शरणागतीची मीमांसा [ पराभूत फ्रान्सनें विजयी जर्मनीपुढे लोटांगण घालून शरणागति पत्क- रली आणि जर्मनीच्या कृपाकटाक्षाखाली चालणारी नवी राज्यघटना करून 'आपला अर्धामुर्धा जवि कसाबसा वांचविला. अशी विपन्नावस्था फ्रान्सला कां प्राप्त झाली याची मीमांसा या लेखांत आहे. ] त्यागी वृत्ति सुटल्याचा हा परिणाम फ्रान्ससारखें एका काळचे कर्दनकाळ असें राष्ट्र, गेल्या महायुद्धांतल्याप्रमाणें चिकाटी न धरतां या महायुद्धांत इतक्या लवकर हातटेकीस आले आणि त्या राष्ट्राच्या सर्वाधिकाऱ्यांनी जर्मनीला व इटालीला जवळ जवळ कोरा चेकच लिहून देऊन शरणागति पत्करली. हा बनाव अत्यंत खेदजनक असून त्याचे परिणाम अति- शय दूरवर पोचणारे आहेत, यास्तव त्याची मीमांसा होणें जरूर आहे. मार्शल पेताँ यांनी शस्त्रसंन्यास करण्याचें ज्या वेळी मनांत योजिलें त्या वेळी परिस्थिति किती अवघड होती, याची रूपरेषा स्वतः मार्शल पेता यांनी पुढील- प्रमाणें वर्णिली. " फारच थोडी मुलें, फारच थोडी शस्त्रास्त्रे व फारच थोडे दोस्त हे आमच्या पराभवाचें कारण आहे. १९१८ साली आमच्या राष्ट्राला विजय मिळाला तेव्हांपासून त्यागाच्या वृत्तीपेक्षां सुखोपभोगाच्या वृत्तीला आमचे लोक जास्त मान देत आले आहेत. लोकांनी त्याग थोडा केला व मागण्या मात्र पुष्कळ मागितल्या. श्रम टाळण्याकडेच लोकांचा कल वाढत चालला आहे. " फ्रान्स देशांतील एकंदर परिस्थिति किती बिघडली आहे याचें हे अगदी हुबेहूब चित्र रेखाटले गेलें आहे यांत शंका नाहीं. तथापि मुख्य मुद्द्याचा प्रश्न हा ( केसरी, दि. २८ जून १९४० )