पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध व्यापण्याचे त्याचें कारस्थान यशस्वी होत आलें, असें पाइतांच मुसोलिनीला स्वस्थ बसवेना. एकट्या जर्मनीनें फ्रान्सचें आक्रमण केल्यास इटालीला भूमध्य समुद्रावर जो ताबा गाजवावयाचा आहे, त्यांत वैगुण्य येईल, हे समजण्याइतका मुसोलिनी धूर्त आहे आणि हिटलरच्याइतका नसला तरी थोडा तरी पराक्रम आपण गाजविला पाहिजे अशी हाव धरण्याइतका तो महत्त्वाकांक्षीहि आहे. यामुळे स्वार्थाच्या व महत्त्वाकांक्षेच्या नादी लागून मुसोलिनीनें युद्धांत भाग घेण्याचे ठरविले असावें. हिटलरनें मुसोलिनीला लढाई पुकारण्याविषयी आग्रह केला असणें संभवनीय दिसत नसून, युद्धांत सामील न होण्याचा आग्रह धरला असेल. परंतु जर्मनीचा आतां- पर्यंतचा अचाट पराक्रम आणि फ्रान्सची झालेली केविलवाणी स्थिति या दोहोंचा जबरदस्त परिणाम होऊन मुसोलिनीने रणशिंग फुंकले असावें. फांसा उलट पडतो का सुलट पडतो पाहावें वरील विवेचन लक्षांत घेतल्यास युद्धाचा यापुढील रागरंग कसा बनत जाईल, याचा अंदाज करतां येतो. इटाली युद्धांत पडतांच अमेरिका लढाईत सामील होईल अशी आशा वाटत होती. तूर्त अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना लागेल तितकी रणसामुग्री उघडपणें पुरविण्याचे जाहीर केले आहे, पण स्वतः इटालीविरुद्ध प्रत्यक्ष लढाई सुरू केली नाहीं ! अमेरिकेचें हें मर्म मुसोलिनीनें आगाऊ ताडलें असावें आणि म्हणूनच त्याच्या हातून युद्धांत पडण्याचें साहस झाले असेल. इटाली युद्धांत आला कीं, बाल्कन राष्ट्रांत हालचाल सुरू होईल असेंहि भाकीत करण्यांत येत होते; पण अद्यापि तेंहि खरें ठरण्याचा संभव दिसत नाहीं. अमेरिकेचें मर्म मुसोलिनीला जितकें लवकर ताडतां येईल त्यापेक्षां बाल्कन राष्ट्रांची नाडी त्याला अधिक लवकर जाणतां येईल. यावरून असेंहि अनुमान काढावेसें वाटतें कीं, बाल्कन राष्ट्रांचाहि रागरंग ताडून मगच इटालीनें हें पाऊल पुढे टाकले असावें. बाल्कन राष्ट्र जर पूर्णपणें तटस्थ राहतील तर इटालीला तितका धोका कमी वाटेल. तथापि कांही झाले तरी जर्मनीला ज्याप्रमाणें, स्वतःचा दोस्तांच्या हल्ल्यापासून बचाव करून, दोस्त राष्ट्रांवर व राष्ट्रांवर वाटेल तेव्हां झडप घालण्याची युद्धशास्त्रदृष्टया सोय होती, तशी सोय इटालीला नसून, त्या बाबतींत इटालीची स्थिति जर्मनीच्या अगदी उलट आहे. दोस्त राष्ट्र इटालीवर अनेक बाजूंनी आपल्या सोयीप्रमाणें काळवेळ पाहून हल्ला करूं शकतील आणि स्वतः जर्मनी जोपर्यंत फ्रान्समधील भयानक रणसंग्रामांत पुरेपूर गुंतला आहे, तोपर्यंत • जर्मनी इटालीला हातभार लावू शकणार नाही आणि असा हातभार लावण्याला जर्मनी मोकळा होण्याच्या आंत दोस्त राष्ट्रांनी जर इटालीची हाडे खिळखिळी केली तर इटालीची धडगत रहाणार नाही आणि मग जर्मनीलाहि संकटच येऊन पडेल. परंतु जर्मनीनें फ्रान्सच्या आक्रमणाचें कार्य त्वरित आटोपलें आणि