पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इटालीनें आगीत तेल ओतलें १७ कांहीं कांही बाबतींत तात्पुरता लाभ झाल्याचे दिसून आलें, तरी एकंदरीत पाहतां इटालीच्या सहकार्यामुळे जर्मनीला नुकसानच पोंचणार आहे. इज्जतीच्या दृष्टीनें अगदी पहिली आपत्ति जर्मनीवरहि ओढवेल की, आतां- पर्यंत दोस्तांना कोठेंहि जर्मनीवर आक्रमण करण्याला व त्याचा पराभव करण्याला जी संधि मिळाली नव्हती ती इटालीच्या युद्धांत पडण्यानें मिळणार आहे. इटालीच्या इतस्ततः पसरलेल्या प्रदेशांवर कोठेंद्दि हल्ला करून तो मुलूख दोस्तांना पादाक्रान्त करतां येईल आणि तेवढ्या जयाची घोषणा करून आपल्या राष्ट्रांतील जनतेची विषण्ण झालेलीं मनें प्रफुल्लित करतां येतील आणि जर्मन लोकांना हिणवितां येईल. युद्धशास्त्रदृष्टया याचा विशेष परिणाम न झाला तरी मानसशास्त्रदृष्टया याचा मोठा परिणाम होणार आहे. ही केवळ तात्त्विक बाजू झाली. याशिवाय दोस्तांचे आरमार भूमध्य समुद्रांत बलाढ्य असल्यानें प्रत्यक्ष इटालीवर हल्ला व आक्रमण होणें शक्य आहे. रणसामुग्रीची नाकेबंदी तर अधिक कडक होईल व तिचा परिणाम इटालीला तर जाणवेलच, पण जर्मनीलाहि तो जाणवल्याशिवाय राहणार नाही. आफ्रिकेतील जर्मन वसाहतींची पूर्वीच्या युद्धांत जी स्थिति झाली तशीच स्थिति या युद्धांत इटालीच्या वसाहतींची होणें संभवनीय आहे. मुसोलिनीनें स्वार्थी महत्त्वाकांक्षेनें उडी घेतली अशा सर्व गोष्टींचा विचार केला असतां जर्मनीनें इटालीला या युद्धांत ओढलें काय, याचें उत्तर नकारार्थीच द्यावें लागतें. वस्तुस्थिति अशी दिसते की, हिटलरच्या आग्रहानें मुसोलिनी या युद्धांत पडला नसून इटालीनें या युद्धांत पडूं नये असा त्याचा सल्ला लाथाडून मुसोलिनी या युद्धांत, इटालीच्या फायद्यासाठी म्हणून, दुराग्रहानें सामील झाला असावा. महायुद्धाच्या आरंभी जर्मनीची भूमिका अशी होती कीं, रशिया, इटाली, हंगेरी प्रभृति राष्ट्रांनी जर्मनीविषयी सहानुभूति दाखवावी, पण तटस्थ राहावें आणि जर्मनीलाच आपलें युद्ध लढूं द्यावें. रशियानें ही भूमिका स्वार्थप्रेरित होऊन आपण होऊन सोडली, जर्मनी अगदी अल्प काळांत सहजासहजीं पोलंड जिंकू शकतो असें पाहिल्यावर रशियाला स्वस्थ बसवेना. जर्मनीनें पोलंड जिंकल्यावर त्यापासून रशियाला कांहीं तरी लाभ मिळण्याचा करार उभय राष्ट्रांत पूर्वीच झाला असेल. पण प्रत्यक्ष युद्धांत सामील झाल्यानें त्यापेक्षां अधिक लाभ होईल, हे ओळखून रशियानें दुसरीकडून पोलंडवर अकल्पित हल्ला केला आणि पूर्वीच्या करारापेक्षा आपल्या पदरांत अधिक प्रदेश पाडून घेतला. पण रशियासारखें बलाढ्य राष्ट्र युद्धांत सामील झाल्यानें जर्मनीची बाजू कमकुवत न होतां उलट आधक मजबूत झाली. इटाली युद्धांत सामील होत आहे यांतलाहि हेतु रशियासारखाच आहे. जर्मनीनें पोलंडपासुन पांच देश पादाक्रान्त केले आणि इटालीच्या अगदीं शेजारच्या भूमध्य समुदत बंदर असलेला असा फ्रान्स देशहि क. ले. २