पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध आणि दुसऱ्या दोन राष्ट्रांच्या सैन्यांना 'दे माय धरणी ठाय' असे म्हणावयास लावून पॅरीसच्या जवळपर्यंत मुसंडी मारली. यावरून जर्मनीचा जबर आत्मविश्वास अनाठायी नव्हता आणि जर्मनीची लढण्याची तयारी जबर होती आणि त्या मानाने दोस्त राष्ट्रांच्या तयारीत ढिलाई दिसून आली, एवढेच सिद्ध झाले. याचा अर्थ असा नव्हे की, जर्मनी जगांतील सर्व राष्ट्रांविरुद्ध एकटा लढूं शकेल. म्हणून आतापर्यंत मिळालेल्या जयानें चढून जाऊन जर्मनी बेफामपणे वाटेल त्या राष्ट्राला आव्हान देऊं लागला आहे, असें समजणे चुकीचें ठरेल. एकटा फ्रान्स देश जिंकणे हे देखील केवढे दुर्घट काम आहे, याची जाणीव जर्मनीला आहे. तरी पण युद्धांतील चढाईच्या धोरणाचा अत्या- वश्यक भाग समजूनच जर्मनीने आपले २० लाख सैन्य फ्रान्समध्ये गुंतविलें आहे आणि 'मारूंकिंवा म' अशा निकरानें फ्रान्सशी त्यानें संग्राम चालविला आहे. जर्मनीनें इटालीस युद्धांत ओढले नाहीं अशा प्राणघातक संग्रामांत जर्मनी गुंतला असतां याच वेळीं इटाली युद्धांत कां पडला, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. इटाली युद्धांत पडल्याने फ्रान्सला दुहेरी शह बसून त्याची स्थिति अधिक केविलवाणी होईल आणि जर्मनीला फ्रान्सची फळी फोडून पॅरीसच्या दक्षिणेकडच्या मुलुखांत घुसण सुलभ होईल हें खरें. पण इटालीनें युद्धांत भाग घेतल्यानें इटालीच्या ताब्यांतील मुलुखांवर अनेक बाजूंनी हल्ला करण्याची वाट दोस्त राष्ट्रांना मोकळी होणार आणि इटालीच्या तटस्थपणा- मुळे व्यापाराच्या दृष्टीनें जर्मनीला जो फायदा मिळत होता, तोहि बुडणार. या दृष्टीने विचार केल्यास, इटाली युद्धांत सामील झाल्यामुळे जर्मनीला जो फायदा वाटत आहे, त्याच्यापेक्षा अधिक पटींनी जर्मनीला नुकसान पाँचणार आहे. असें असतां जर्मनीने ही धोंड गळ्यांत कां अडकवून घेतली ? पूर्वीच्या महायुद्धांत ऑस्ट्रियासारखें दुर्बळ व बिनतयारीचें राष्ट्र जर्मनीच्या बाजूला असल्यामुळे जर्मनीचें एकंदरीत नुकसानच झाले. पण त्या वेळीं युद्धाचा उगमच ऑस्ट्रियांतून झाला असल्यामुळे ऑस्ट्रियाची धांड जर्मनीने आपल्या गळ्यांत कां बांधून घेतली, असा प्रश्नच विचारतां येण्यासारखा नव्हता. ऑस्ट्रियाला युद्धाला निमित्तमात्र पुढे करून जर्मनीनें आपला साम्राज्यवृद्धीचा डाव टाकून पाहिला. तशी स्थिति या वेळीं नाहीं. युद्धाच्या सुरुवातीच्या कारणाशीं इटालीचा कांही संबंध नव्हता आणि आतांपर्यंत युद्धाचे रागरंग अनेक प्रकारें पालटले तरी इटालीनें युद्धांत पडलेच पाहिजे अशी कोणतीहि परिस्थिति उद्भवली नव्हती. अर्थातच इटालीनें युद्धांत भाग घेणें हें केवळ इटालीच्या मनोदयावर अवलंबून होतें. असे असतां जर्मनीने स्वार्थासाठी इटालीला या युद्धांत बळेंच ओढलें, अशी जी कित्येकांची समजूत आहे ती चुकीची आहे. इटाली युद्धांत आल्यानें जर्मनीला