पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध इटाली जर तटस्थ राहिला असतां तर महायुद्धाची आग युरोपच्या बाहेर पसरली नसती. परंतु जर्मनीला फ्रान्स देशांत जो अपूर्व विजय मिळाला त्यानें इटालीच्या तोंडाला पाणी सुट्न आणि जर्मनीच्या रणकौशल्यानें भाळून जाऊन इटालीने महायुद्धांत जर्मनीच्या बाजूनें उडी घेतली. यामुळे महायुद्धाच्या आगीत तेल ओतल्याप्रमाणें होऊन ती आग आतां आफ्रिकेंत व आशिया खंडांतहि पसरेल हैं ओळखून त्यासंबंधाचें विवेचन या लेखांत केलेलें आहे. ] इटालीची जर्मनीशीं गट्टी जमली महायुद्धाचा वणवा पेट्न नऊ महिने झाले. एवढ्या काळांत ही आग पसर विण्याची कामगिरी रशिया व जर्मनी या दोन देशांकडून होत आली आणि पोलंड, फिनलंड, नॉर्वे, डेन्मार्क, हॉलंड व बेल्जम इतक्या देशां आहुत्या त्या आगीत आतांपर्यंत पडल्या असून फ्रान्सवरहि मोठी आणीबाणीची वेळ आली आहे. अशा ऐनप्रसंगी इटालीनें फ्रान्स व इंग्लंड यांच्याविरुद्ध युद्ध जाहीर करून महायुद्धाच्या आगीत तेल ओतण्याचें आसुरी कृत्य केले आणि ही आग नुसत्या युरोप खंडांतच नव्हे तर आफ्रिका व आशिया खंडांतहि पसरविण्याचा मार्ग मोकळा करून दिला. पूर्वीच्या महायुद्धाच्या प्रसंगी इटाली हा ऑस्ट्रो-जर्मन गट्टींतून फुटून दोस्त राष्ट्रांना मिळाला होता. परंतु युद्धसमातीनंतर जर्मनीच्या व ऑस्ट्रियाच्या साम्रा- ज्याची जी विल्हेवाट लावण्यांत आली तींत इटालीला कांहींच लाभ झाला नाहीं. हे शल्य त्याच्या मनांत टोचत असल्यामुळे इटाली हा दोस्तांच्या गटांतून फुट्न विमनस्क तटस्थ असा वागूं लागला. त्यानंतर इटालीवर कम्यूनिझमचें अरिष्ट कोसळत असल्याचे पाहून मुसोलिनीने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली; आणि इटालींत फॅसिस्ट पद्धतीचा अंमल सुरू झाला. तिकडे जर्मनीतहि अशाच अनेक अंतस्थ भानगडी- नंतर कम्यूनिझमचें संकट टाळण्यासाठी आणि राष्ट्रीयत्वाचें दृढीकरण करून जर्मन राष्ट्राला बलसंपन्न करण्यासाठी नाझीझमचा पुरस्कर्ता हिटलर हा पुढे आला व सर्व सत्ता त्याने बळकावली. त्या वेळेपासून 'समानशीले व्यसनेषु सख्यं या न्यायानें हिटलर व मुसोलिनी यांची दोस्ती जमली आणि जर्मनी व इटाली हे दोनहि देश एकमेकांच्या तंत्रानें वागूं लागले. १ इतका स्नेह जुळला तरी जर्मनी महायुद्धांत उडी घेईल तर इटालीहि त्याच्या पाठोपाठ त्या खाईत उडी टाकील असा कोणासच भरंवसा वाटत नव्हता. एक तर इटालियन लोकांची चंचल व बेभरवशाची सर्वश्रुत आहेच. पण त्या शिवाय मुख्य कारण हे होते की, महायुद्धांत आपण सामील झालो तर आपल्या ताब्यांतील मुलुखावर दोस्त राष्ट्रांकडून चोहोबाजूंनी चढाई होण्यासारखी आहे