पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इटालीन आगीत तेल ओतले १३ झाले नाहीं; तथापि युद्धाची व्याप्ति वाढल्याशिवाय राहणार नाही. यापुढे या युद्धाचा रागरंग कसा काय बनत जातो त्याची चर्चा पुढील अंकापासून क्रमशः येईलच. पण यांत वाचकांना एक इषारा देऊन ठेवणे जरूर आहे. तो हाच कीं, युद्ध सुरू झाल्याने आतां यापुढे ज्या परदेशाच्या बातम्या इकडे येतील त्या सेन्सॉरकडून पास होतील तेव्हांच मिळावयाच्या. याकरितां युद्ध- वार्ता वाचतांना शब्द सोडलेल्या धड्याप्रमाणे त्या चाचपडतच वाचाव्या लागतील आणि स्वतःच्या तकनिंच कित्येक ठिकाणी समस्यापूर्ति करावी लागेल. प्रतियोगी सहकारितेचें उत्तर असो; आतां महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे सरकारालाहि एक सूचना करणें प्राप्त आहे. या महायुद्धांत हिंदुस्थाननें आपणास सर्वतोपरी साहाय्य करावे अशी इंग्लंडची अपेक्षा असणारच व व्हाइसरॉयांनी आपल्या संदेशद्वारा ती जाहीरहि केली आहे. पण सरकार स्वतःचें कर्तव्य तेवढे विसरतें आणि जनतेकडून मात्र कर्तव्यपूर्तीची अपेक्षा करते हैं उचित नव्हे. सरकारने सर्व हिंदी- पुढान्यांस विश्वासांत घेऊन त्यांच्या आकांक्षा समजून घ्याव्या आणि ज्या रास्त व राष्ट्रीय स्वरूपाच्या आकांक्षा असतील त्या पूर्ण कराव्या. पूर्वीच्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय पुढाऱ्यांनी सहकारितेकरिता पुढे केलेला हात सरकारने झिडकारून राष्ट्राचा अपमान केला आणि युद्ध संपतांच रौलेट अॅक्ट पास करून आणि जालियनवाला बागेत कत्तल करून आपल्या कृतघ्नतेचें व आसुरी वृत्तीचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्या वेळेपासून सरकारविषयी प्रजेच्या मनांत साशंक वृत्ति नांदत आहे. ती दूर करावयाची असल्यास पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचें परिमार्जन हल्लींच्या अधिकाऱ्यांनी आधी केले पाहिजे. तशी सहकारितेची वृत्ति सध्याचे व्हाइसरॉय कृतीने दर्शवितील आणि राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करतील तर जनतेच साशंक वृत्ति दूर होऊन हिंदी राष्ट्राकडूनहि त्यास प्रतियोगी सहकारितेचें उत्तर मिळाल्यावांचून राहणार नाहीं. इटालीनें आगीत तेल ओतलें [ महायुद्धाला प्रारंभ होऊन नऊ महिनें होईपर्यंत इटाली तटस्थ होता. पहिल्या महायुद्धाच्या वेळीं देखील प्रारंभी इटाली तटस्थ होता, पण मागाहून तो दोस्त राष्ट्रांना मिळाला. दुसऱ्या महायुद्धांत इटाली दोस्तांच्या बाजूला मिळणें अशक्य होतें. तरी पण तो जर्मनीला न मिळतां तटस्थ राहूं शकला असता. ( केसरी, दि. १४ जून १९४० )