पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध म्हणून त्या वाटाघाटीला फांटे फोडूं नयेत. जो काय सोक्षमोक्ष व्हावयाचा असेल तो तेथल्या तेथें त्या बैठकीत व्हावा. परंतु पूर्वी ऑस्ट्रियाशी व नंतर झेकोस्लोव्हा- कियाशी जर्मनीने कसे करारमदार करून घेतले याची आठवण पोलंडला ताजी असल्याने पोलंडला ही अट अमान्य झाली. इंग्लंडनें जर्मनीला कळविलें की, राष्ट्राराष्ट्रांत नेहमीं जशी वकिलामार्फत बोलणींचालणी होतात तसेंच हैं हि बोलणे चालावें. बर्लिनमध्ये पोलंडचा वकील आहे तो जर्मनीच्या अटी ऐकून घेईल व या आपल्या सरकारला कळवील; त्यावर पोलंड आपल्या मित्रराष्ट्रांचा सल्ला घेऊन आपले उत्तर जर्मनीकडे पाठवील; त्यावर जर्मनीचें प्रत्युत्तर आल्यास त्याचीहि अशीच चिकित्सा होईल. असला हा दिरंगाईचा प्रकार जर्मनीने नाकारला; कारण, गेल्या मार्च महिन्यांत असल्या वाटाघाटी होऊन त्यांतून काय निष्पन्न होतें तें कळून चुकलेंच होतें. तशीच चालढकल यापुढे चालू देण्यास जर्मनी तयार नव्हता आणि पोलंडहि निश्चितपणं पूर्वीपेक्षा आपण एवढ्या अधिक अटी मान्य करतों असे सांगण्याला तयार नव्हता. त्यामुळे दि. ३० ऑगस्टच्या संध्याकाळ- पर्यंत पोलंडचा अधिकृत असा वकील येऊन दाखल न झाल्यानें जर्मनीने दि. ३१ पासून युद्धाच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आणि दि. १ ला डॅझिग आपल्या राज्यांत सामील केल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून युद्धाचा श्रीगणेशाय नमः केला. इंग्लंड आणि फ्रान्स यांचें पोलंडला पूर्ण पाठबळ असल्याने हेर हिटलर हा अखेरचा फांसा टाकण्याला कचरेल अशी इंग्लंडची समजूत होती असे दिसते. त्याकरितांच इंग्लंडनें आपला स्वतःचा निश्रय कांहीच जाहीर न करतां दि. ५ पर्यंत पार्लमेंटची बैठक तहकूत्र केली होती. परंतु हेर हिटलरने पोलंडमध्यें घुस- ण्याचें घाष्टर्य केले आणि बाँब फेकणारी विमानें वासवर घिरट्याहि घालू लागली, तेव्हां मग इंग्लंडनें आणखी खलिता पाठविला की, जर्मनीनें पोलंडमध्ये घुसलेलें सैन्य परत बोलवावे आणि वाटाघाटीला तयार व्हावें ! युद्धासाठी सैन्याची जमवा- जमव होण्यापूर्वीच्या शांत वातावरणांत देखील तडजोडीच्या ज्या अटी फेटाळल्या गेल्या त्या अटी, उभय पक्षांची विमानदळें एकमेकांवर आगीचा वर्षांव करूं लागल्यानंतर मान्य केल्या जातील असे मानणें हें कल्पनाशक्तीला कल्पनातीत ताण देणेंच होय. अशा अटी अशा वेळी सुचविणारांच्या मनाला त्याचा फोलपणा कळलेला असतोच; परंतु जनलज्जेसाठी असले देखावे चालू असतात. समस्यापूर्ति करावी लागेल असो; युद्धाला प्रारंभ झाल्यानंतरचा हा तडजोडीचा प्रयत्न निष्फळ ठरल्यावर इंग्लंडनें जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकार केला आणि फ्रान्सनेहि त्याचीच साथ केली. अशा रीतीनें पोलिश जर्मन युद्धाला व्यापक स्वरूप प्राप्त झालें. अद्यापि इटाली या युद्धांत पडला नसल्यानें युद्धाला जगव्याळ स्वरूप प्राप्त