पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धाचा वणवा पेटला आपला हक एकमताने प्रस्थापित झाला आहे असे जर्मनी गृहीत धरून चालला होता आणि गिडनिया बंदर पोलंडला मोकळे सोडले म्हणजे त्यांचे उभयतांचे समान हक्क प्रस्थापित झाले; मग इतर भागाबद्दलची मतमोजणी कोणालाहि अनुकूल वा प्रतिकूल होवो, अशी जर्मनीची भूमिका होती. इज्जतीचां प्रश्न आडवा आला या वाटाघाटी गेल्या वर्षापासून चालू होत्या व त्यांना निश्चित स्वरूप गेल्या मार्च महिन्यांत आले. परंतु पोलंडने त्यास एकसारखा नकारच दिला. इंग्लंड व फ्रान्स या दोन प्रबळ राष्ट्रांचा पोलंडला पाठिंबा असल्यामुळे आणि इंग्लंडचे रशि- याशी तह घडवून आणण्याचे प्रयत्न त्या वेळेपासून चालूच असल्यामुळे पोलंडला अशी खात्री वाटत होती की, जर्मनीला डॅझिग विभागच काय, पण एक तसूभरदि जागा न देतां झिडकारतां येईल आणि याच कल्पनेने यापूर्वी पोलंडने या संबंधांत बेफिकिरी दाखविली. परंतु जर्मनीनें इंग्लंडवर मात करून रशियाशी तहनामा केला आणि त्यामुळे पोलंडचा मोठा आधार तुटला. परिस्थिति अशा रीतीने प्रतिकूल झाल्यावर पोलंडने जर्मनीच्या पूर्वीच्या अटी स्वीकारण्याची तत्परता दर्शविली असती तर युद्धाची आपत्ति टळली असती. परंतु येथेंच इज्जतीचा प्रश्न आडवा आला. पोलंडनें या अटी मान्य केल्या असत्या तर त्याचा इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांच्या वचनावर विश्वास नाहीं असा त्याचा अर्थ झाला असता. इंग्लंडनें पोलंडला त्या अटी कबूल करण्याचा सल्ला दिला असता तर इंग्लंडने विश्वासघात केला असे सगळ्या जगानें म्हटले असतें आणि जर्मनीनें आपला आग्रह सोडला असता तर जर्मन राष्ट्राची नाचक्की झाली असती. अशा परिस्थितीत प्रत्येक राष्ट्राला हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे असे वाटू लागून माघार घेण्यास कोणीच तयार होईना आणि जो वाद तोंडाच्या शब्दानें मिटू शकला असता तो वाद तोफा व बाँबगोळे यांच्या गर्जनेनें तोडण्याचा अट्टाहास आतां सुरू झाला आहे. दिरंगाईचा प्रकार जर्मनीने नाकारला वाटाघाटीचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले असून देखील प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी एकदां अखेरची धावपळ होतेच; त्याप्रमाणे दिनांक २८, २९ व ३० ऑगस्ट असे तीन दिवस तारायंत्रद्वारे ही धावपळ चालूच होती व त्यामुळेच इंग्लंडांतहि एक प्रकारचें अविश्वासाचें वातावरण निर्माण झाले होते. या अखेरच्या प्रयत्नांत जर्मनीने असा आग्रह धरला की, दि. ३० च्या संध्याकाळपर्यंत पोलंडचा वकील बर्लिनला येऊन दाखल व्हावा आणि त्याला तहनामा करण्याला अधिकारपत्र दिलेले असावें. ही अट घालण्यात जर्मनीचा हेतु उघडच असा होता की, एकदां वाटाघाट सुरू झाली म्हणजे पुनश्च त्यांत इतरांनी 'बीच में मेरा चांदभाई'