पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध महायुद्धाचा वणवा पेटला [ म्युनिचच्या शरणागतीच्या स्वरूपाच्या करारानें १९३८ मध्यें जें युद्ध टळलें असें वाटलें होतें तें युद्ध अखेरीस भडकलेंच. १९३८ मध्यें सुडे- तें टन प्रकरणांत इंग्लडनें हार खाऊन युद्ध टाळलें. १९३९ मध्यें पोलंडच्या मुलुखांतून पूर्व-प्रशियाला जोडणारा रस्ता आपणांस मिळावा अशी जर्मनीनें मागणी केली. परंतु या वेळीं इंग्लंडनें हार खाण्याचें नाकारलें आणि पोलंडच्या निमित्तानें महायुद्धाचा वणवा पेटला. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी उभय राष्ट्रांत कोणत्या मुद्दयांवर वाटाघाटी झाल्या आणि अखेरीस तडजोड फिसकटून इंग्लंडनें जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकारा कसा केला याचे सविस्तर वर्णन या लेखांत आहे.] AW नाहीं, होय करतां करतां अखेरीस महायुद्धाचा वणवा पेटलाच. मागील अंकी दर्शविल्याप्रमाणे दि. ३१ पर्यंत उत्तरं प्रत्युत्तरं चालू होती आणि त्यांतून तडजोडीचा कांहीं तरी मार्ग निघणे अगदींच अशक्य नव्हते. परंतु आधीं युद्धाची जय्यत तयारी आणि मग आयत्या वेळी वाटाघाटीसाठी धावपळ, असा प्रकार झाल्यानें तडजोडीची इच्छा कितपत खरी आहे, याची शंका वाटू लागून शाब्दिक उत्तरें- प्रत्युत्तरें बंद पडली आणि बॉबगोळ्यांची उत्तरें- प्रत्युत्तरं सुरू झाली ! तडजोड कोणत्या मुद्द्यावर व कोणत्या प्रकारानें होऊं शकेल याचें दिग्दर्शन गेल्या अंकाच्या अग्रलेखांत आम्ही केलेच होतें; आणि आश्चर्याची गोष्ट ही कीं, जर्मनीनें पोलंडला सुचविलेल्या ज्या अटी आतां प्रसिद्ध झाल्या आहेत त्या जवळ जवळ त्यासारख्याच आहेत. त्यांत फरक एवढाच आहे की, कॉरिडॉरचा प्रश्न मत- मोजणीने सोडवून घेण्यास जर्मनी तयार होता आणि ती मतमोजणी बारा महिन्यांनंतर व्हावी अशी जर्मनीची सूचना होती. जें राष्ट्र मतमोजणी मानावयाला व त्याकरितां एक वर्ष थांबण्याला तयार होतें त्याला मतमोजणीच्या निर्णयाविषयी: खात्री वाटत असावी असें मानून चालावयास हरकत नाहीं. मतमोजणी आपल्याविरुद्ध गेली तर पूर्व प्रशियाला जोडणारा नुसता रस्ता तरी मिळावा आणि त्या रस्त्याची रुंदी सुमारे पाऊण मैल असावी असेंद्दि जर्मनीचें मागणें होतें आणि मतमोजणी जर्मनीला अनुकूल झाल्यास पोलंडला तेवढ्याच रुंदीचा रस्ता गिडनिया बंदरापर्यंत देण्याला जर्मनी तयार होता. असे असतां ही तडजोड नाकारण्यांत आली याचें कारण एवढेच दिसतें कीं, इंझिगवर ( केसरी, दि. ५ सप्टेंबर १९३९ )