पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर्मन गरुडाची भरारी ऑस्ट्रियाला निर्वाणीचे खलिते नाझी मताचे लोक साधारणपणे तरुण आहेत. त्यांच्यापैकी कांही चोवीस वर्षाच्याहि आंत आहेत. त्यामुळे नाझी पक्षीयांत असंतोष माजला व मतदानाचा निकाल अखेर समाजसत्तावाद्यांना अनुकूल होईल असे वाटू लागले. डॉ. शस्निग यास मनांतून नाझी अमलाऐवजी समाजसत्ताक अंमलच हवा असा हिटलर यास दाट संशय आला. इकडे नाझीपक्षीयांचे ऑस्ट्रियांत दंगे सुरू होऊन पोलिसांनी शेंकडों नाझींना अटकहि केली. हिटलरला आतां ऑस्ट्रियास भिववून सोडण्यास मनगटाचा जोर एवढाच उपाय उरला. त्याने आपला तोफखाना व सैन्य ऑस्ट्रियाच्या हद्दीवर आणून उभे केले. या सैन्याच्या बळावर हिटलरने ऑस्ट्रियाला दोन निर्वाणीचे खलिते पाठविले. पहिल्या खलियांत गेल्या रविवारी व्हावयाची मतनोंदणी रहित करण्यांत यावी व डॉ. शस्निग यानें राजिनामा द्यावा अशी मागणी होती. त्याप्रमाणे मतनोंदणी रहित झाली. पण शूस्निग यानें राजिनामा दिला नाही. म्हणून दुसरा निर्वाणीचा खलिता हिटलरा- कडून धडकला. त्यांत शस्निग यास राजिनाम्यास फक्त दीड तासाचा अवधि देण्यांत आला. तेव्हां नाइलाजानें तो राजिनामा देऊन मोकळा झाला. त्याच्या जागी चॅन्सेलर या नात्याने हिटलरच्या सांगण्याप्रमाणे डॉ. सिसइनक्कार्ट याची नेमणूक झाली. शस्निग याच्या पाठोपाठ ऑस्ट्रियाचा अध्यक्ष मिक्लास याचा राजिनामा आला. डॉ. सिसइनक्कार्ट हा हिटलरचा कट्टा पुरस्कर्ता आहे. त्यानें आपलें नवें मंत्रिमंडळ बनवून ऑस्ट्रियांत शांतता ठेवण्यासाठी फौज पाठविण्यास हिटलर यास तारेनें कळविलें ! हिटलरला तार पोंचतांच दि. १० रोजी रात्री १० वाजतां जर्मन सैन्य सर- हद्द ओलांडून ऑस्ट्रियांत शिरलें. आतांपर्यंत दोन लक्ष जर्मन सैन्य व्हिएन्नाच्या आसपास जमले आहे. त्यांत पायदळ, रिसाला व तोफखाना आहे. हर हिटेलर ऑस्ट्रियाच्या हद्दीत लिंझ येथें विमानानें गेला असून जर्मन विमानें ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना याजवर घिरट्या घालीत आहेत. ऑस्ट्रियावर नाझी अंमल बसला व ऑस्ट्रियाचा ताबा जर्मन फौजेने घेतला. याचा अर्थ असा की, ऑस्ट्रिया व जर्मनी यांची सांगड पक्की झाली. हिटलरला घडावयास पाहिजे होते तं त्यानें अशा डावपेंचांनी घडवून आणिले. ऑस्ट्रियास जर्मनीने आज अशी मगरमिठी मारली; उद्या झेकोस्लोव्हिाकियासहि काबूंत आणल्याशिवाय तो राहणार नाहीं. कालच्यापेक्षां आज जर्मनीचें सामर्थ्य कितीतरी वाढले आहे व आजच्यापेक्षां तें उद्यां आणखी किती तरी वाढणार आहे. पण झेकोस्लोव्हाकियाच्या वाटेस तो इतक्यांतच जाईल असे वाटत नाहीं.