पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध फ्रान्स आंतून इतका खिळखिळा व पोखरलेला आहे की त्याची मंत्रिमंडळे पत्त्याच्या घराप्रमाणे वाऱ्याच्या झुळकेसरशी कोलमडून पडतात. गेल्या आठवड्यांत एम्. शॉटेम्स यांचे मंत्रिमंडळ सोशालिस्ट व कम्यूनिस्ट यांच्या विरोधापुढे असेंच कोलमडले. अशा देशावर सर्वस्वी अवलंबून राहून इटाली व जर्मनी यांचें आपणां- बरोबर वितुष्ट वाहू देणे इंग्लंडला धोक्याचें वाटत असल्यामुळे इंग्लंड हा इटाली व जर्मनी यांना प्रसन्न करून घेण्याच्या उद्योगास लागला आहे. रोममध्ये दि. ८ रोजी ब्रिटिश वकील लॉर्ड पर्थ व इटालियन परराष्ट्रमंत्री कौंट सियानो यांनी एकत्र बसून एक तासपर्यंत मसलत केली. मसलतींत अॅबिसी- नियावरील इटालीच्या साम्राज्यास इंग्लंडनें मान्यता देण्याचा विषय निघाला. इटाली आपल्या ऑबिसीनियावरील साम्राज्यास युरोपांतील एकएका राष्ट्राची संमति मिळवीत चाललाच आहे. त्याने अलीकडे धेरलेले सावज पोलंड हे होय. इटालीने पोलंडची मान्यता आपल्या साम्राज्यास मिळविली असून रशियाविरुद्ध त्यास आपल्या पक्षांत सामील करून घेण्यासाठी त्याजबरोबर त्याचे करारमदार सुरू आहेत. त्यानंतर बेल्जमनेंहि इटालीच्या साम्राज्याला संमति दिली आहे. एक ब्रिटिश वकील रोममध्ये इटालियन परराष्ट्रमंत्र्याबरोबर खलबत करीत असतां बर्लिनमधील दुसरा ब्रिटिश वकील जर्मन मुत्सद्द्यांशी वाटाघाटीत गुंतला होता. जर्मनी व इंग्लंड यांचें आज जर कशाविषयीं घासत असेल तर तें वसाहती- विषयों होय. इंग्लंडनें आफ्रिकेतील वसाहत जर्मनीपासून घेतली या वेळी जी जगाची वांटणी दोस्त राष्ट्रांनी आपसांत केली ती वांटणीहि आफ्रिकेतील जर्मन वसाहत जर्मनीस परत देतांना बदलावी लागेल असें इंग्लंडतर्फे जर्मनीला सांगण्यांत आले. परंतु ही सबब यापुढे न चालतां इंग्लंडला जर्मन वसाहत सोडावी लागेल असा डाव जर्मनीचा सर्वाधिकारी हर हिटलर मांडीत चालला आहे. हर हिटलर यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत ऑस्ट्रियांत जी गडबड उडवून दिली ती इतकी विस्मयकारक आहे की, तिजमुळे सारं जग चकित झाले आहे. ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर डॉ. शस्निग हा थोड्या दिवसांपूर्वी जर्मनीत जाऊन हिटलरला भेटला होता. या भेटींत हिटलरनें शस्निग यास ऑस्ट्रियाच्या मंत्रिमंडळांत व राज्यकारभारांत कांही नाझी पक्षीयांना घ्यावयास लावले. त्याच वेळी ऑस्ट्रियांत हळूहळू नाझीपक्षीयांची एकमुखी सत्ता स्थापन होण्याची चिन्हें दिसली. परंतु शस्निग यास हा बनाव घडून यावयास नको होता. तरी पण हिट- लरला उघडपणे विरोध करण्याची शूस्निग याच्या अंगी ताकद नव्हती म्हणून त्यानें ऑस्ट्रियांतील सर्व प्रौढांचे मत घेऊन या भानगडीचा निकाल लावण्याचें योजलें. मात्र त्याबरोबर मताधिकार फक्त चोवीस वर्षांवरच्या लोकांना असल्याचे जाहीर केले.