पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर्मन गरुडाची भरारी दारी आहे, याचा आतांपर्यंत दोस्त राष्ट्रांना जो विसर पडल्यासारखा दिसत होता त्याची त्यांना हिंडेंबुर्गकडून जाणीव करून दिली जाईल. सारांश, जर्मन गरुडाचे तोडलेले पंख पुनः फुटल्यानें आतां त्यास निष्कारण डिवचण्याचे चाळे बंद पडतील आणि जर्मनीचा राष्ट्रसंघांत समावेश होऊन त्यांत एकतर्फी न्यायमनसुबा न होतां यापुढे दुसरी बाजू ऐकून घेणें त्यास भाग पडेल. १९१८ साली निरुपाय होऊन इत्यार खाली ठेवल्यावेळेपासून जर्मनीची जी दुर्दशा उडाली होती तींतून अवघ्या सहा वर्षांत जर्मनीनें पुनः डोकें वर काढलें, यापासून समान स्थितीतील राष्ट्रांनी चांगलाच बोध घेण्याजोगा आहे. जर्मन गरुडाची भरारी [ १९२५ च्या मे महिन्यांत मार्शल हिँडेंबुर्ग हा जर्मन राष्ट्राचा अध्यक्ष निवडला गेला त्या वेळीं 'जर्मन गरुडाचे तोडलेले पंख पुनश्च फुटले' अशा शब्दांनीं जर्मनीच्या पुनरुत्थानाचें अभिनंदन करण्यांत आलें होतें. त्यानंतर दहा वर्षांनी १९३५ च्या जानेवारींत सारप्रांत जर्मनीला परत मिळाला आणि जर्मनीच्या हृदयांतलें अपमानशल्य निघून 'जर्मन गरुड' धष्टपुष्ट होऊं लागला. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत जर्मनीनें व्हर्साइलच्या तहांतील ८० वें कलम झुगारून देऊन जबरदस्तीनें ऑस्ट्रियाचें राज्य आपल्या राज्यास जोडलें. जर्मन गरुडानें ही जी व्हिएन्नापर्यंत भरारी मारली तिचें वर्णन या लेखांत केलेले आहे. ] इंग्लंडचा जर्मनीला प्रसन्न ठेवण्याचा यत्न युरोपांत रोम, बर्लिन व मॉस्को हीं तीन राजकीय घडामोडीची. मुख्य केंद्रे असून त्यांजकडे नजर लावून आपला नित्याचा व्यवहार पाहावा अशी युरोपांतील • इतर लहानमोठ्या राष्ट्रांची दिनचर्या ठरली आहे. रशियापासून इटाली व जर्मनी यांना स्वतःचा बचाव करावयाचा आहे व जमल्यास रशियांतील समाजसत्ताक राज्यव्यवस्था रसातळास न्यावयाची आहे. आणि इंग्लंडपासून त्या दोन्ही राष्ट्रांना शक्य तितके फायदे घ्यावयाचे आहेत. उलटपक्षी इंग्लंडला इटाली, जर्मनी व रशिया यांचा असंतोष घालवून त्यांना प्रसन्न ठेवावयाचे आहे. इंग्लंडच्या पक्षांत युरोपांतील महत्वाचा व खन्या विश्वासाचा देश फ्रान्स हा एकटाच आहे. पण (बेसरी, दि. १५ मार्च १९३८ भो