पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध राष्ट्रांनी कायसरच्या कारकीदीतील लष्करशाहीची नालस्ती करकरून जर्मनांची मनें इतकी विटविली होती की, जर करितां त्या वेळी कायसर चुकूनमाकून जर्मनींत परत आला असता तर अमेरिकेतल्या नीग्रोप्रमाणे त्याजवर 'लिंचिंग'चा प्रयोग झाला असता ! परंतु दोस्त राष्ट्रांची ही शिकवण स्वार्थसाधूपणाची आहे व तिच्या नादी लागल्यास जर्मनीचा निःपात होईल, असे जर्मन मुत्सद्दयांच्या लक्षांत येऊन त्यांनी जनतेची बिथरलेली मनें ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला; आणि फ्रान्स प्रभृति राष्ट्रांनी जर्मनीच्या दुबळेपणाचा गैरवाजवी फायदा घेऊन रुहर प्रांत बळ- कावल्याचे दृष्टीस पडतांच जर्मनीच्या डोक्यांत खरा प्रकाश पडला आणि त्या वेळे- पासून कायसरशाहीला अनुकूल असा वारा वाहूं लागला. जर्मन युवराजाला आपल्या इस्टेटीच्या गांवीं परत येण्याला परवानगी मिळाली हे या मतपरिवर्तनाचेंच स्पष्ट चिन्ह होय. त्यानंतर फ्रान्सने जेव्हां रुहर प्रांत बळकावला त्या वेळी त्यांस सशस्त्र प्रतिकार करतां येत नसल्याने जर्मन राष्ट्राने निःशस्त्र प्रतिकाराचं • असहकारितेचें - आधुनिक शस्त्र परजून पाहिलें. पण तेंहि बोथट व निष्फळ ठरल्यानें जर्मनीनें पुनः पूर्ववत् आपली संघटना करण्यास प्रारंभ केला. हिंडेवुर्गचा विजय हा ही संघटना पूर्ण झाल्याचा पुरावाच होय. - डिवचण्याचे चाळे बंद पडतील महायुद्धामुळे विस्कटलेली घडी जर्मनीनें आतां पुनश्च बसविली आहे. जर्मनीतील शाळा-कॉलेजें पूर्ववत् चालू झाली आहेत. जर्मन कारखाने मालाची पैदास पहिल्यापेक्षा अधिक करूं लागले असून, परदेशांतून त्या मालाचा उठावहि समाधानकारक होत आहे. मार्क्सच्या नव्या चलनांचा भाव स्थिरावला आहे. आणि डांस कमिटीने ठरविलेले नुकसानभरपाईचे हप्ते न चुकतां भरण्याची ऐपत जर्मनीच्या अंगी आली आहे. एवंच जर्मनींतील अंतर्गत स्थिति बरीच सुधारल्यानें आतां परराष्ट्रांकडून होणाऱ्या उपमर्दाचा व जुलमाचा प्रतिकार करण्यास जर्मनी पुढे सरसावला आहे. सेनापति हिंडेंबुर्गला अध्यक्ष निवडल्याने जर्मनी कांही प्रत्यक्ष युद्ध पुकारणार आहे अशांतला भाग नाहीं. परंतु गेली पांच-सहा वर्षे दोस्त राष्ट्रें म्हणतील ती पूर्वदिशा असा जो प्रकार होता तो दूर होऊन 'अरे तर कारे असें प्रत्युत्तर देण्यास जर्मनी समर्थ झाल्यामुळे आतां त्याला कोणी ‘अरे तुरे' करणार नाहीं. जर्मनीनें युद्धसामुग्री दडवून ठेवली आहे असा त्याजवर आळ घालून दोस्तांनी जर्मनीचा मुलूख सोडून जाण्याचें आतांपर्यंत नाकारलें. पण आतां त्यांस पुरावा तरी द्यावा लागेल, नाही तर कोलोन वगैरे टापू सोडून तरी द्यावा लागेल. तसेंच आतांपर्यंत 'मऊ सांपडले म्हणून कोपराने खणण्याचा जो प्रकार फ्रान्सने चालविला होता त्यास आळा बसेल आणि व्हर्सेलीसचा तह पाळण्याची जबाबदारी जशी जर्मनीवर आहे तशीच दुसऱ्या बाजूनें फ्रान्सवरहि कांहीं जबाब-