पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर्मन गरुडाचे तोडलेले पंख पुनश्च फुटले राहिले. अशा या स्तंभित वृत्तीतून इंग्लंडच प्रथम भानावर आले आणि इंग्लंडांतील मेघनाद पत्रानें आपलें नेहमींचें अस्त्र बाहेर काढून हिंडेबुर्गची निवडणूक कराळ तर याद राखून असा अशी धमकी दिली ! फ्रेंच पत्रांनीहि पुनः तलवार म्यानांतून बाहेर काढावी लागेल असे म्हणून धाकदपटशा दिला. पण जर्मनीनें कोणाच्याहि रागलोभाची पर्वा न करतां हिंडेंबुर्गचीच निवडणूक करून आपला निश्रय तडीस नेला. ५ हिंडेंबुर्गच्या नांवांत किती जादू भरली आहे याचे प्रत्यंतर निवडणुकीच्या सामन्यांत तर दिसून आलेच; कारण पूर्वीची कांहीएक तयारी नसतां आणि मत- याचना करण्यासाठी कोटेहि व्याख्यानाचा दौरा न काढतां केवळ नांव जाहीर करून, बसल्या ठिकाणांहून न हालतांच, हिडेंबुर्गला दीड कोटि मते मिळाली. ही स्वदेशांतली गोष्ट झाली. पण परराष्ट्रांतहि या जादूची मोहिनी कांही कमी प्रभाव- शाली झाली आहे असें नाहीं. निवडणुकीपूर्वी जर्मनीला धमकी देणारा इंग्लंडांतील 'मेघनाद' आतां तिसन्या सप्तकांतला आपला सूर उतरवून हिंडेंबुर्ग अध्यक्ष झाला म्हणून काय झाले, जोपर्यंत जर्मनीनें व्हर्सेलीसच्या तहाच्या अटी मोडल्या नाहींत तोपर्यंत आपणांस तिकडे पाहाण्याचे कारणच नाही, असे सौम्य उद्गार काढू लागला आहे. हिंडेबुर्ग हा कायसरचा एकनिष्ठ भक्त असला तरी 'रिपब्लिक' राज्यपद्धतीच चालू ठेवण्याची त्याने शपथ घेतली आहे, तेव्हां कायसरशाही सुरू होण्याची वस्ती निरर्थक आहे, असे म्हणून कित्येक पत्रे आपले समाधान करून घेत आहेत. फ्रान्स- मधील खळबळ मात्र इतक्या लवकर व सहजासहजी शांत होणें शक्य नाही. तथापि यापुढे पूर्वीसारखी जर्मनीची कुचेष्टा व अवहेलना करून चालणार नाहीं; आणि जर्मनीनें जर तहाच्या अटींचा भंग केला असेल तर त्याचें माप पुराव्यानिशीं त्याच्या पदरीं घातले पाहिजे असाच फ्रेंच पत्रांतून सूर निघत आहे. खुद्द जर्मनीत देखील आजच कायसरला किंवा कायसरपुत्राला परत आणण्याविषयों फारसा कोणी उत्सुक आहे असं नाही; किंबहुना लोकसत्ताक पद्धति झुगारून देऊं नये व जुनी राजवट पुनरुज्जीवित करूं नये, असाच लोकमताचा वारा जर्मनीत वाहत आहे. अर्थातच जर्मनीत राज्यक्रान्ति होण्याचा संभव दिसत नाहीं. परंतु राष्ट्राची इभ्रत व उन्नति हीं राज्यपद्धतीच्या नाटकी देखाव्यावर नव्हे तर जनतेच्या अंतःकरणांतील वृत्तीवर अवलंबून असतात. जुनं राजशाहीचें युग जाऊन नवं लोकशाहीचे युग सुरू झाल्याने अनेक राष्ट्रांत अलीकडे राज्यक्रान्त्या झाल्या आहेत. परंतु राष्ट्रांतील लोकांचा स्वभाव जोपर्यंत बदलला नाही तोपर्यंत राजाच्या नांवानें कारभार चालला काय अगर अध्यक्षाच्या नांवानें तो चालला काय फल- श्रुति सारखीच. याच दृष्टीनें जर्मन राष्ट्राच्या हालचालीकडे पाहिल्यास हिंडेंबुर्गच्या निवड णुकीचें रहस्य वाचकांच्या लक्षांत येईल. महायुद्राच्या परिसमातीच्या वेळी दोस्त