पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध समाविष्ट होत असल्याने सर्व अपमान निमूटपणे सहन करून जर्मनीनें प्रथमतः आपले सर्व लक्ष बलसंवर्धनाकडे लाविलें. व्यापार हे आधुनिक राष्ट्रांचें जीवन आहे यास्तव जर्मनीने प्रथम आपल्या व्यापाराची घडी ठाकठीक बसविली, रशियाशी संधान बांधून आपले भांडवल, तज्ज्ञ आणि यंत्रसामुग्री त्या देशांत नेऊन तेथे कारखाने उभारले. परराष्ट्रांतले आपले जुनें गि-हाईक परत आपल्याकडे वळवून घेण्याकरितां त्यास शक्य तितक्या सवलती देऊं केल्या. लढाऊ जहाजे व विमानें बांधण्याची बंदी असल्यामुळे व्यापारी जहाजें व विमानें अशा कुशलतेनें बांधली की वाटेल त्या वेळी त्यांचें रूपांतर करता यावें. आपल्यावरचा जुन्या कर्जाचा बोजा हलका करण्याकरितां कागदी मार्क्सची किंमत बेसुमार उतरवून दिवाळे काढले, आणि जुन्या कर्जातून मुक्त होऊन अमेरिकेच्या नव्या कर्जाच्या जोरावर नवें कागदी चलन सुरू करून साखसुरत पुनः व्यापार चालू केला. अशा विविध युक्त्या प्रयुक्त्यांनी जर्मनीने गेल्या पांच वर्षात आपले अंतस्थ बळ वृद्धिंगत केलें, त्याचबरोबर परराष्ट्रांची दोस्ती संपादन करण्याचाहि डाव चालूच होता. एका बाजूला फ्रान्स व बेल्जम आणि दुसऱ्या बाजूला पोलंड व झेकोस्लो- व्हाकिया एवढींच राष्ट्र अशी आहेत की, त्यांचें जर्मनाशी सख्य होणें हें सर्पाचें मुंगसाशी सख्य होण्याइतकेंच दुरापास्त आहे. पण इतर राष्ट्रांशी तसें उपजत वैर नसल्यामुळे रशिया, अमेरिका, जपान, इटाली इत्यादि महायुद्धकालीन शत्रुराष्ट्र, ऑस्ट्रिया व तुर्कस्थान हीं त्या वेळचीं स्नेही राष्ट्र आणि हॉलंड, स्पेन, स्वीडन वगैरे तटस्थ राष्ट्र या सर्वांच्या पुढे जर्मनीने दोस्त राष्ट्रांकडून आपल्यावर होत असलेल्या अन्या- याचा पाढा वाचून त्यांची मैत्री नसली तरी आस्ते आस्ते सहानुभूति संपादन केली.. अशा रीतीनें एकीकडून अंतस्थ शक्तीची वाढ झाली आणि दुसरीकडे परिस्थितीचें वातावरणहि अनुकूल बनलें; त्याबरोबर जर्मन गरुडाचे छाटलेले पंख पुनः फुटूं लागले आणि त्या पंखांत आतां पूर्ववत् शक्ति आल्याचे चिन्ह दिसूं लागतांच त्याने आपले पंख फडफडावण्यास सुरुवातहि केली आहे. गरुडानें पंख हलवितांच गडबड उडाली अध्यक्षपदासाठी हिंडेंबुर्गसारखा राजसत्तावादी आणि कायसरचा पक्का अभि- मानी असा महारथी पुढे करून जर्मन गरुडानें आपले नवे पंख हलवितांच युरोप- खंडांतील राजकीय वातावरणांत मोठीच खळबळ उडून गेली. ब्रिटिश सिंह डोळे उघडून आश्चर्यानें वर पाहूं लागला, फ्रेंच चित्ता रागानें आपली शेपटी आपटूं लागला. या व्याघ्रसिंहांच्या बळावर पूर्वी जर्मन गरुडाला सतावणारी पोलंड प्रभृति क्षुद्र जनावरें भीतीनें हंबरडा फोडून मदतीची याचना करूं लागली आणि इतर सर्व प्राणी हा नवा प्रकार काय आहे याचा उमज न पडल्यानें आश्चर्यचकित होऊन