पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर्मन गरुडाचे तोडलेले पंख पुनश्च फुटले ३ गोविली. आणि त्या वाक्यांनीच जर्मन राष्ट्राचे अंतःकरण हलून जाऊन जर्मनीच्या सांप्रतच्या विपन्नावस्थेत जर कोणी उद्धारकर्ता असेल तर तो हिंडेंबुर्गच होय अशा भावनेनें मतदारांनी त्यांस आपली मतें दिली व हिंडेंबुर्ग अध्यक्ष- स्थानावर अधिष्टित झाले. गरुडाला डिवचण्याचा खेळ डॉ. मार्क्स अगर डॉ. जॉरिस यांच्यासारखे नव्या मनूंतले मुत्सद्दी बाजूस सारून जर्मनीनें अध्यक्षपदाची माळ हिंडेंबुर्गसारख्या केवळ तलवारबहाद्दराच्या गळ्यांत कां घातली याची मीमांसा करणे फारसं कठीण नाहीं. महायुद्धाच्या समातीपासून जर्मन राष्ट्राला कायमचें खच्ची करण्याचा फ्रेंचांचा डाव सुरू झाला आणि लास इंग्लंड व इटाली यांनी कधीं गर्भित संमति तर कधी मूक संमति दिली. जर्मन राष्ट्राची शक्ति कमी करण्याकरितां या दोस्त राष्ट्रांनी आस्ट्रियाला जर्मनीपासून अगदी अलग केला, रशिया व जर्मनी यांच्या दरम्यान पोलंडची भिंत उभारली, एका बाजूचा सायलेशियाचा व दुसऱ्या बाजूचा व्हाइन- लँडचा लचका तोडण्यांत येऊन जर्मनीची खनिज संपत्ति संपुष्टांत आणली, जर्म- नीच्या बहुतेक सर्व आरमाराला जलसमाधि दिली, वैमानिक दलाची अशीच वाताहत केली, जर्मनींत एक लक्षाहून अधिक खडें सैन्य असूं नये अशी अट घालून शिवाय जर्मन राष्ट्रांत हत्यारे किती असावीत, हत्यारांचे कारखाने किती चालावेत, कवाईत किती इसमांना शिकवावी इतक्या बारीकसारीक गोष्टींतहि दोस्तांनी जर्मनीचे हातपाय बांधून टाकले आणि एवढ्यानेंहि त्यांच्या खुनशी मनाचें समाधान न होऊन त्यांनी त्याच्या पाठीवर निखर्वावधि रुपयांच्या कर्जाचे ओझें लादले. आणि या अटी जर्मनीकडून तंतोतंत पाळल्या जात नाहीत, असा बहाणा करून फ्रान्सने रूहर प्रांतहि व्यापिला. लष्कर व आरमार हे दोनहि पंख तोडले गेल्यामुळे लोळागोळा बनलेला आणि कर्जाच्या असह्य बोजाखाली पाठ वाकून जमिनीस खिळलेला हा आपला प्रति- पक्षी आतां पुनः डोके वर काढणार नाही अशी फ्रान्सची समजूत होती. पण शत्रूची एवढी विपन्नावस्था पाहूनहि फ्रान्सच्या मनाचें पूर्ण समाधान झाले नाहीं. जर्मनीने आपल्या जवळची हत्यारें दडवून ठेवली आहेत असा कांगावा करून या गोष्टीची शहानिशा करण्याकरितां फ्रान्सने एक कमिशन जर्मनीत धाडलें; आणि त्या कमिश नचा रिपोर्ट प्रसिद्ध न करतां चोरून हत्यारे बाळगल्याचा गुन्हा जर्मनीवर शाबीत होतो असें ठरवून कोलोन टापूंतून आपले सैन्य परत नेण्याची दोस्त राष्ट्रांनी टाळा. टाळी चालविली. जर्मन गरुडाला डिवचण्याचा फ्रान्सचा खेळ युद्धसमाप्तीपासूनच चालू असल्यानें जर्मनांचा संताप आंतल्या आंत धुमसत होता. तथापि दुर्बळांचा संताप हा दरिद्रयाच्या मनोरथांप्रमाणेच 'उत्पयन्ते विलीयन्ते' अशा कोटीत